देवेंद्र फडणवीसांमुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला – शरद पवार

मुंबई | निवडणूक आयोगाने अखेर बिहार विधानसभा निवडणुच्या सर्व २४३ जागांचे निकाल जाहीर केले आहेत. अंतिम आकडेवारीनुसार बिहारमध्ये पुन्हा नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाच एनडीएचे सरकार बनणार आहे. एनडीच्या खात्यात १२५ जागा जमा झाल्या आहेत. तर सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर असलेल्या महागठबंधनला ११० जागा मिळाल्या आहेत.

या बिहार निवडणुकीची जबाबदारी भाजपाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली होती. याचबरोबर जाहीर होत असलेल्या निवडणुकीत एनडीएला मिळत असलेल्या यशानंतर फडणवीस यांचे कौतुक होत आहे.

याचाच धागा पकडत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील बिहार निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले आहे. याबाबत ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘बिहार निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपाच्या जास्त जागा दिसत असले तरी पण नितीशकुमार यांचे मोठे नुकसान होईल असे जे वाटले होते तसे काही घडले नाही.’

तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बिहारमध्ये चमत्कार झाला हा प्रकाश आमच्या डोक्यात पत्रकारांमुळेच पडला आहे, अशा शब्दात पवारांनी फडणवीसांना चिमटा काढला. ‘तेजस्वी यादव यांना जे यश मिळालं आहे ते खूप चांगलं आहे. यामुळे अनेक तरुणांमध्ये उमेद निर्माण होईल अशी मला आशा आहे,’ असे पवार म्हणाले.

दरम्यान, ‘मी जी संपूर्ण प्रचारमोहीम पाहिली त्यानुसार स्वत: पंतप्रधान यामध्ये खूप रस घेत होते. यामुळे एका बाजूला पंतप्रधान, नितीश कुमार यांच्यासारखे अनुभवी नेते आणि दुसऱ्या बाजूला अनुभव नसलेले पहिल्यांदाच निवडणूक लढणारे तेजस्वी यादव होते,’ असे पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
बिहारचा ‘बाहुबली’ कोण? ‘आरजेडी’ने घेतली मुसंडी, एनडीए आणि महाआघाडीत ‘कांटे की टक्कर’
कॉग्रेसला उपदेशाचे डोस पाजणाऱ्या संजय राऊतांना कॉंग्रेस नेत्यानेच फटकारले..
टफ फाइट! ‘आरजेडी’नं भाजपला ओव्हरटेक करत घेतली मुसंडी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.