भाजपपाठोपाठ सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचाही लॉकडाऊनला विरोध; मुख्यमंत्र्यांची कोंडी…

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे या परिस्थितीवर नियंत्रणासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने राज्यात लॉकडाऊन करण्यास विरोध केला आहे.

लॉकडाऊन बाबतची राष्ट्रवादीची राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भूमिका स्पष्ट केली. राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनचा विचार आला आहे. पण लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. तसा आग्रहच आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आला आहे, असे मलिक यांनी सांगितले.

‘…तर लॉकडाऊनबाबत नियोजन करा’
राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही, विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, मास्क याचे पालन होताना दिसत नाही.’

तसेच पुढे ते म्हणाले, ‘लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला  आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

महत्त्वाच्या बातम्या 

‘हातावर पोट असलेल्या एक कोटी लोकांना प्रत्येकी पाच हजार द्या आणि मग लॉकडाऊन करा’

दारूच्या नशेत असताना मध्यरात्री अजय देवगणला मारहाण? हा व्हिडीओ खरा की खोटा

देशमुख फॅमिलीचा होळीचा हा भन्नाट व्हिडीओ तुम्ही पाहिला का? पाहून तुम्हीही म्हणाल, मस्त!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.