एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली होती. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. त्यानंतर भाजपने शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री झाले आहेत.(NCP rohit pawar statement on election)
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नवीन सरकार जास्त काळ टिकणार नाही. लवकरच मध्यवर्ती निवडणुका लागतील, असा दावा राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील नेत्यांनी केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एक नवीन दावा केला आहे.
मध्यवर्ती निवडणुका लागल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त आमदार निवडून येतील, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. आमदार रोहित पवार सध्या कर्जत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आमदार रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवार यांनी भाजप आमदार राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार म्हणाले की, “मध्यवर्ती निवडणुका लागल्या तर आपल्याला निवडणूक लढवावीच लागेल. पण निवडणुका लागू नये, याकरिता आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. एखादा विषय चिघळला असेल तर तो कोर्टात जातो. कोर्टात गेल्यानंतर निवडणुका घ्याव्याच लागतील”, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले आहे.
आमदार रोहित पवार पुढे म्हणाले की, “जर मध्यवर्ती निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त आमदार निवडून येतील. मागील निवडणुकीत काही फरकाने पराभूत झालेले राष्ट्रवादीचे आमदार या निवडणुकीत निवडून येतील. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांचे मताधिक्य देखील यावेळी वाढलेले असेल”, असे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
भाजप आमदार राम शिंदे यांच्यावर टीका करताना आमदार रोहित पवार म्हणाले की, “मंत्रिपद असताना तालुक्यामध्ये अनेक गोष्टी प्रलंबित राहिल्या आहेत. आता राम शिंदे तालुक्यात विकास कामे होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असतील तर ते योग्य नाही. माझ्या दोन्ही तालुक्यात अन्याय झाला तर ते मी खपवून घेणार नाही”, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
काय छत, काय आमदार निवास, कसं रहायचं इथं? आमदार शहाजी बापू पाटलांच्या रूमचं कोसळलं छत
जबरदस्त प्रेमकहाणी आणि सुपरहिट ऍक्शन, वाचा थॉर: लव्ह ऍन्ड थंडरचा रिव्ह्यु
चित्रपटापेक्षा वेगळी धोनीची खरी लव्ह स्टोरी, ‘इथे’ झाली होती कॅप्टन कुल आणि साक्षीची पहिली भेट