सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन रोहित पवारांची विरोधकांवर जोरदार टीका; म्हणाले…

मुंबई | सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन विरोधक राजकारण करत आहेत. सध्या शिक्षण आणि आरोग्य हा विषय महत्त्वाचा असून यावर चर्चा होणे गरजेचे असल्याचं मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

तसेच ‘सीबीआयकडे तपास गेला. मात्र, या राजकारणामुळे मुंबई पोलिसांचं नाव खराब होतं आहे. माझी गोष्ट सोडा, हे कोणत्या व्यक्तीला आवडणार नाही,’ असं पवार म्हणाले.

याचबरोबर ‘विरोधक फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करतात. तर काही महत्त्वाचे विषयांवर पोलीस मार्ग काढू शकतात,’ असं रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, ‘एखादी व्यक्ती जेव्हा ट्विट करते, ते त्यांचं व्यक्तिगत मत असतं. मात्र, मला पोलिसांवर विश्वास आहे”, असं पार्थ पवार यांच्या ट्विट विषयी रोहित पवारांनी आपलं मत व्यक्त केलं.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.