परमबीर सिंगांनी ‘असा’ रचला कट, लेटरबॉम्ब प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्याचा खळबळजनक दावा

मुंबई | मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी वसूल करण्याचे टार्गेट दिले असल्याचा आरोप गृहमंत्र्यांवर लावलेला आहे. याचं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं.

गृहमंत्र्यांवर लावलेल्या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. परमबीर सिंगांच्या आरोपानंतर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

अशातच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपेंनी ट्विट करत नवा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. “लेटरबॉम्ब कट कसा जन्माला आला? परमबीर सिंगांची पत्नी काही कंपन्यांत भागीदार आहे. पोलिसांकडून टीआरपी घोटाळ्याची चौकशी सुरू होताच एका कंपनीला ईडीची नोटीस आली.”

“मग विदर्भातील नातेवाईक आमदाराद्वारे सिंगांनी महाराष्ट्र विरोधी नेत्याची आणि दिल्ली शहाची भेट घेतली. तूर्तास एवढेच बाकी लवकरचं! असं वरपे यांनी ट्विट केलं आहे.”

राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी परमबीर सिंगांनी लेटरबॉम्ब टाकला असल्याचं बोललं जात आहे. हा सर्व कट परमबीर सिंगांनी भाजपच्या सांगण्यावरून रचला असल्याचं राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे यांच्या ट्विटमधून दिसून येत आहे.

दरम्यान ट्विटमध्ये वरपे यांनी तुर्तास एवढचं, बाकी लवकरचं असं नमुद केलं आहे. त्यामूळे येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीचे नेते परमबीर सिंगांविरोधात काय मोठा खळबळजनक खुलासा करतात. परमबीर सिंगांनी टाकलेला लेटरबॉम्ब फुटून या प्रकरणात काय समोर येतयं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
“फडणवीस रोज पहाटे चार वाजता उठून राज्यपालांना फोन करतात आणि विचारतात…”
संजय राऊत तुम्ही काय शरद पवारांचे प्रवक्ते आहात का? नाना पटोलेंनी राऊतांना झापले
“पेशवाई आणण्यासाठी धुंद झालेले ‘बंटी बबली’ आता राजकारणात धुमाकूळ घालत आहेत”
“नितेश राणे यांचा पराभव करून शिवसेना काय चीज आहे, ते दाखवून देऊ”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.