शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे या ४६ आमदारांना सोबत घेऊन नवीन गट स्थापन करणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.(NCP leader’s advice to Raj and Uddhav Thackeray)
शिंदे गटाला भाजपचा पाठिंबा असल्याची माहिती मिळत आहे. भाजप शिंदे गटातील आमदारांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातही फोनवरून चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिंदे गटाकडे मनसेचा देखील पर्याय असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सर्व राजकीय परिस्थितीबाबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या परिस्थितीत एकत्र यायला हवं आणि भाजपाला उत्तर द्यायला हवं, असे मत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केलं आहे.
एका मुलाखतीत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, “दोन्ही भावांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे. त्यांनी महाराष्ट्राला दाखवून द्यायला हवं की होय आम्ही बाळासाहेबांची पोरं आहोत. आमच्याकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहू शकत नाही. हा इशारा भाजपाला देणं गरजेचं आहे”, असे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सांगितले आहे.
१६ बंडखोर आमदारांना पाठवलेल्या निलंबनाच्या नोटिसीविरोधात एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावली पार पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे. न्यायालयाने उपसभापती अजय चौधरी, सुनील प्रभू आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाच दिवसांत या नोटीसला उत्तर द्यावे, असे म्हटले आहे.
शिंदे गटाची आज एक महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत सरकार स्थापनेच्या संदर्भात प्रस्ताव तयार करणार असल्याचे सांगितले जात आहे. आज भाजपच्या नात्यांची देखील बैठक पार पडली आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गट मिळून लवकरच सरकार स्थापन करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
रोहीतची एक्स गर्लफ्रेंड संतापली, म्हणाली त्याच्या आणि माझ्याबद्दल….
‘एकनाथ शिंदे फ्लोअर टेस्टसाठी जाणार नाहीत’; प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं मोठं कारण
“त्याच लग्न झालं आहे, आमच्याबद्दल बोलणं बंद करा”, रोहितच्या एक्स गर्लफ्रेंडचे चाहत्यांना आवाहन