मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराजवळ एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवार(Sharad Pawar) यांच्या घरात घुसण्याचा देखील प्रयत्न केला आहे.(ncp leader baban kanvje talk about st workers)
यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. काही आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक देखील केली आहे. तसेच आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या चपलांचे जोडे शरद पवार यांच्या घराच्या दिशेने फेकले. आंदोलनकर्त्यांच्या या कृतीवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले आहेत.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानाकडे धाव घेतली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. “वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिल्यास एसटी कर्मचाऱ्यांना घरात घुसून मारू”, असा इशारा राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने दिला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका केली आहे. जर गुणरत्न सदावर्ते खाली दिसला तर त्याला सोडणार नाही असा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
यावेळी राष्ट्रवादी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणाला की , “आंदोलनकर्त्यांमधील काही एसटी कर्मचारी दारू पिलेले होते. कोणाच्या तरी सांगण्यावरून त्या एसटी कर्मचाऱ्यांनी हा हल्ला केलेला आहे. आमच्या पक्षाच्या अध्यक्षांवर केलेला हल्ला आम्ही खपवून घेणार नाही. राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिल्यास आम्ही तुम्हाला घरात घुसून मारू.”
यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या बाजूने घोषणाबाजी केली आहे. तसेच शरद पवार यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील या हल्ल्यावर मत व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांचे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.