Share

Solapur : महाराष्ट्राला हादरवणारा कांड! लॉजमध्ये एकटी होती महिला, राष्ट्रवादीचा नेता जबरदस्तीने आत शिरला अन्…

Manohar Sapate

Solapur: सोलापूर शहरातील एका लॉजमध्ये एका विवाहित महिलेशी गैरवर्तन झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाचे (NCP – Sharad Pawar Faction) माजी महापौर मनोहर सपाटे (Manohar Sapate) यांच्यावर करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात (Faujdar Chowdi Police Station) गुन्हा दाखल झाला असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

तक्रारदार महिला सध्या पुणे (Pune) येथे राहतात. त्या मूळच्या उत्तर सोलापूर तालुक्याच्या (North Solapur Taluka) असून शेतीसंदर्भातील न्यायालयीन वादासाठी सोलापुरात वकिलांची भेट घेण्यासाठी येत असतात. 14 जून रोजी त्या मनोहर सपाटे यांच्या मालकीच्या शिवपार्वती लॉजमध्ये (Shivparvati Lodge) थांबल्या होत्या.

मध्यरात्रीच्या वेळी दार ठोठावून केले विनयभंगाचे प्रयत्न

16 जून रोजी रात्री सुमारे 12 वाजता, सपाटे यांनी लॉजच्या रूमचा दरवाजा ठोठावून, महिलेसोबत जबरदस्तीचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, त्यांनी स्पष्ट नकार दिल्यावर सपाटे यांनी अश्लील भाषा वापरली आणि धमकी दिली की, “मी मोठ्या वयाचा असल्यामुळे लगेच जामिनावर बाहेर येतो.”

त्यानंतर सपाटे यांनी पीडित महिलेला वारंवार फोन करत संबंध ठेवण्याचा आग्रह केला. 24 जून रोजी महिला अ‍ॅड. योगेश पवार (Adv. Yogesh Pawar) यांचा सल्ला घेण्यासाठी सोलापुरात आल्या असताना, आरोपीने रूम नंबर 307 वर येण्याचा आग्रह केला. महिलेनं या वेळी स्टिंग ऑपरेशन करत व्हिडीओच्या माध्यमातून आरोपीच्या वर्तनाचे पुरावे गोळा केले.

25 जून रोजी महिलेनं पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यानुसार मनोहर सपाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी फौजदार चावडी पोलीस करत असून, पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now