सध्या राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून सध्या राज्यातील राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुका(Election) देखील जवळ आल्या आहेत. येत्या २० जूनला विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. (NCP give vidhan parishad ticket to eknath khdase and ramraje naik nimablkar)
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. विधान परिषदेसाठी भाजपकडून पाच उमेदवार देण्यात येणार आहेत. या उमेदवारांची नावे देखील जाहीर करण्यात आली आहेत. शिवसेना पक्षाकडून दोन उमेदवारांना विधान परिषदेसाठी तिकीट देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना विधान परिषदेसाठी तिकीट देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या रखडलेल्या यादीत देखील एकनाथ खडसे यांचे नाव होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या विधानपरिषद निवडणुकीसाठी श्री. रामराजे नाईक निंबाळकर आणि श्री. एकनाथराव खडसे हे उमेदवार असतील. दोन्ही उमेदवार विजयी होऊन महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतील, असा आम्हाला विश्वास आहे”, असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या विधानपरिषद निवडणुकीसाठी श्री. रामराजे नाईक निंबाळकर आणि श्री. एकनाथराव खडसे हे उमेदवार असतील. दोन्ही उमेदवार विजयी होऊन महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतील, असा आम्हाला विश्वास आहे. @NCPspeaks
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 9, 2022
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संधी मिळाल्यामुळे एकनाथ खडसे लवकरच विधिमंडळ सभागृहात दिसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सभागृहात खडसे विरुद्ध भाजप असा जोरदार सामना रंगणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. शिवसेनेकडून यावेळी विधान परिषदेसाठी संजय राऊत आणि संजय पवार यांना संधी देण्यात आली आहे.
तसेच काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेसाठी भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना तिकीट देण्यात आलं आहे. भाजपकडून विधान परिषदेसाठी प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे आणि उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. त्याचवेळी भाजपकडून विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
सदाभाऊ खोत यांना लाॅटरी! फडणवीसांनी शेवटच्या क्षणी जाहीर केली विधानपरीषदेची उमेदवारी
फडणवीसांनी अखेरच्या क्षणी खोलला शेवटचा पत्ता, ‘या’ नेत्याला दिली विधानपरीषदेची उमेदवारी
पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल बंद करणार, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय; हॉटेलमालकांची नाराजी