Share

शिवसेनेसाठी राष्ट्रवादी रणांगणात उतरली; आमदार थांबलेल्या गुवाहाटीतील हाॅटेलबाहेर..

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या ४६ आमदार आहेत. हे सर्व आमदार गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(NCP enters battle for Shiv Sena; Outside the hotel in Guwahati where the MLA stopped)

शिवसेनेने आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत बंडखोर आमदारांच्या बाबतीत काही महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच आज भाजपच्या कोअर कमिटीची देखील बैठक होणार आहे. एकनाथ आणि बंडखोर ४६ आमदार सध्या नवीन गट स्थापन करण्यासंदर्भातील रणनीती आखण्यात व्यस्त आहेत.

यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या प्रकरणात एंट्री घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी सध्या गुवाहाटीत पोहचले आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी सध्या गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये आहेत. या हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी टेहळणी करताना आढळले आहेत. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर

यावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुशल करंजावणे आणि सुहास उभे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. कुशल करंजावणे हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सचिव आहेत. तसेच सुहास उभे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य समन्वयक आहेत. कुशल करंजावणे आणि सुहास उभे हे दोघे एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी वास्तव्यास असलेल्या रेडिसन ब्लु या हॉटेलबाहेर फिरताना दिसले आहेत.

यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवले आहे आणि त्यांच्याजागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी ४६ बंडखोर आमदारांना सोबत घेऊन स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने भरत गोगावले आणि बच्चू कडू यांची प्रवक्तेपदी निवड केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजपचा पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी चर्चा करण्यासाठी शिंदे गटाकडून एक शिष्टमंडळ तयार करण्यात आलं आहे. या शिष्टमंडळात शिंदे गटातील शंभूराज देसाई, बच्चू कडू, दादा भुसे आणि भरत गोगावले अशा काही महत्वाच्या आमदारांचा समावेश करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
आपल्याला हसवून कपिल शर्माने कमावले आहेत करोडो रुपये, वर्षाला भरतो ‘एवढ्या’ कोटींचा टॅक्स
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर राष्ट्रवादीची नजर; गुवाहाटीच्या हॉटेलजवळून टेहळणी
..म्हणून आपल्यावर ही वेळ आली, एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदेंनी सांगितलं कारण

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now