उगाच धमक्या देण्यापेक्षा सत्तेच्या बाहेर पडून दाखवा, पटोलेंना राष्ट्रवादीने खडसावले

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी युपीएचे अध्यक्षपद शरद पवारांकडे देण्याचे वक्तव्य केले होते. यावरून राज्यात काँग्रेस आणि शिवसेनेत ठिणगी पडली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत काय शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का, असे प्रश्न विचारला होता.

याचाच धागा पकडत राऊतांनी युपीए हा राष्ट्रीय स्तरावरील विषय राज्य स्तरावरील, जिल्हास्तरावरील नेत्यांनी यावर बोलू नये, असे सुनावले होते. आता यावर पटोले यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.

‘संजय राऊत हे काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करत असतील तर आम्हालाही विचार करावा लागेल. राज्यातील महाविकासआघाडी सरकार हे काँग्रेसच्या टेकूवर उभे आहे, ही बाब शिवसेनेने लक्षात ठेवावी, असा रोखठोक इशारा पटोले यांनी दिला होता.

 

दरम्यान, या वादात राष्ट्रवादीने देखील उडी घेतली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता प्रवीण कुंटे पाटील यांनी पटोले यांना लक्ष केले आहे. ‘श्री नाना भाऊ पटोले यांनी तारतम्य ठेवून बोलावं अशी अपेक्षा आहे. मा. पवार साहेबांमुळेच आज काँग्रेस राज्यात सत्तेमध्ये आहे, याचे भान त्यांनी ठेवावे. उगाच धमक्या देण्यापेक्षा सत्तेच्या बाहेर पडून दाखवाच. मग कळेल सर्व.’

महत्त्वाच्या बातम्या 

ना मास्क ना सोशल डिस्टनसिंग, खासदार नवनीत राणा यांनी धरला ठेका; पहा व्हिडीओ

राजेश खन्ना कधीच स्वतःचे चित्रपट टिव्हीवर पाहत नव्हते; कारण ऐकून थक्क व्हाल

‘मनसेकडून आमदारकी लढवलेल्या ‘या’ प्रसिद्ध गायिकेने केला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.