Share

Chhagan Bhujbal On Manikrao Kokate : भुजबळांच्या एका वाक्यात कोकाटेंचा विषय संपला? नेमकं काय बोलले?

Chhagan Bhujbal On Manikrao Kokate : राज्य सरकारमध्ये मंत्रीपद भूषवणाऱ्या माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा पत्त्यांचा खेळ खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सामान्य जनतेच्या मनात संतापाची लाट उसळली. शेतकरी, गरीब नागरिक यांच्यासाठी काम करणं अपेक्षित असलेल्या मंत्र्यांनी असं वागणं योग्य आहे का, असा प्रश्न लोक विचारू लागले. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही मत व्यक्त करत एका वाक्यात सगळी चर्चा संपवून टाकली.

राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळांचा रोखठोक इशारा

माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले, “पत्ते खेळणं हे तटकरे (Tatkare) यांनी केलं नव्हतं.” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे कोकाटेंना टोला लगावला. भुजबळ पुढे म्हणाले की, मला या राजीनाम्याच्या मागणीची कोणतीही अधिकृत माहिती नाही. ही बाब संबंधित व्यक्तींनीच स्पष्ट करावी. त्याचवेळी सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरून काढून टाकण्यावरही ते म्हणाले, “मला त्याची माहिती नाही, अजित दादांनी (Ajit Pawar) काय आदेश दिले हे माहिती नाही.”

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणावर भुजबळ काय म्हणाले?

2006 साली मुंबईत (Mumbai) 11 मिनिटांत 7 ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले होते, ज्यामध्ये 209 निरपराधांचा जीव गेला. या प्रकरणातील 12 आरोपींना नुकताच न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं. या निर्णयावर छगन भुजबळ म्हणाले, “18 वर्षे झाली असतील, शिक्षा संपली असेल. तरीही सरकार सुप्रीम कोर्टात (Supreme Court) जाऊ शकते. मला पूर्ण माहिती नाही.” म्हणजेच, सरकारच्या वकिलांच्या आढाव्यानंतर पुढील पावले उचलली जातील, असाच संकेत त्यांनी दिला.

हनी ट्रॅप व द्वारका सर्कलप्रश्नीही दिल्या स्पष्ट प्रतिक्रिया

हनी ट्रॅप प्रकरणाविषयी भुजबळ म्हणाले की, यामध्ये मुख्यमंत्री (Chief Minister) स्वतः लक्ष घालत असून, पोलिस खातं आपलं काम करत आहे. आपण काही बोलणं योग्य ठरणार नाही.

द्वारका सर्कल (Dwarka Circle) परिसरातील वाहतूक समस्येबाबत त्यांनी सांगितले की, “सिग्नलच्या ठिकाणी ट्रक उभे राहतात, पोलिसांना अधिक प्रशिक्षण देण्याची गरज आहे.” PWD विभाग सध्या अभ्यास करत आहे, तो पूर्ण झाल्यावर उपाययोजना केल्या जातील. मात्र, दोन वर्षांपेक्षा आधी तोडगा लागणार नाही, असंही स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now