राजकारणात कधी कोणते पक्ष एकत्र येतील आणि कधी कोणते पक्ष वेगळे होतील, याचा अंदाज लावता येत नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार बनत असताना एकमेकांच्या विरोधात असलेले शिवसेना(Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) हे पक्ष एकत्र आले होते. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला होता. आता एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची तयारी दर्शविली आहे.(NCP and MIM make alliance, imtiyaz zaleel and rajeh tope meeting)
त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. एमआयएम पक्षाचे आमदार इम्तियाझ जलील यांनी राज्याचे आरोग्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये एमआयएम आणि महाविकास आघाडीच्या युती संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एमआयएम पक्षाचे आमदार इम्तियाझ जलील यांनी यासंदर्भात खुलासा केला आहे.
एमआयएम पक्षाचे आमदार इम्तियाझ जलील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, “दोन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी राजकीय चर्चा देखील झाली. या भेटीत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याची तयारी दर्शविली आहे. आता यावर त्यांच्याकडून काय रिप्लाय येतो हे पाहू”, असे इम्तियाझ जलील यांनी सांगितले.
‘महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएम पक्षाची तयारी आहे. शरद पवारांपर्यंत हा निरोप पोहोचवा’, अशी विनंती देखील आमदार इम्तियाझ जलील यांनी राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांना भेटीदरम्यान केली आहे. या ऑफरवर शिवसेनकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
एमआयएम पक्षाचे आमदार इम्तियाझ जलील या मुलाखतीत पुढे म्हणाले की, “केवळ राष्ट्रवादीचं नाही तर काँग्रेस सोबत देखील आम्ही जायला तयार आहोत. भाजपला हरवायचे असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची ही वेळ आहे. त्यामुळे ही बाब राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गंभीरतेने घ्यावी. राजेश टोपे यांनी शरद पवारांपर्यंत हा निरोप पोहचवावा”, असे इम्तियाझ जलील म्हणाले आहेत.
“मुळात एमआयएम पक्षाला सोबत घेणे कुणालाही नको आहे. पण मुस्लिम मते सर्वांना पाहिजेत. काँग्रेस स्वतःला धर्मनिरपेक्ष पक्ष मानतो. पण त्यांना देखील मुस्लिम मतं हवी आहेत. तर त्यांनीही यावं. आम्ही त्यांच्यासोबतही युती करायला तयार आहोत”, असे देखील आमदार इम्तियाझ जलील म्हणाले आहेत. आता महाविकास आघाडी एमआयएम पक्षाच्या ऑफरवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत मोठा बदल, ‘या’ दिग्गज अभिनेत्याने अचानक सोडली मालिका
…म्हणून प्रियंका चोप्राला विकावी लागली आपली लक्झरी कार; कोट्यवधींच्या घरात होती कारची किंमत
‘भाभी जी घर पर है’ मालिकेतील हप्पु सिंग एका एपिसोडचे घेतो तब्बल ‘इतके’ पैसे; वाचून बसेल धक्का