डाव पुन्हा पलटला! जप्त केलेली ‘ती’ गाडी फडणवीसांच्या ‘गुडबुक्स’मधल्या बिल्डरची

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्बने आणि मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणाने राज्यातले राजकारण तापलेले आहेत. ठाकरे सरकारवर या प्रकरणात अनेक आरोप होत आहेत. त्यातल्या त्यात विरोधी पक्षाने सरकारला वेठीस धरले आहे.

यामध्ये सचिन वाझे यांच्यावर अनेक आरोप झाले असून त्यांना एनआयएने अटक केली आहे. २५ मार्चपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात एनआयएने पाच गाड्याही ताब्यात घेतल्या आहेत. या गाड्या सचिन वाझे आणि त्यांच्या साथिदारांच्या आहेत अशी माहिती सुत्रांकडून मिळाली होती.

यामध्ये एक वॉल्वो कार ताब्यात घेतली होती. ही कार दमणमधून उचलण्यात आली होती. ही कार सचिन वाझे यांच्या बिझनेस पार्टनरची आहे असं सांगण्यात आलं होतं. पण इकडे राष्ट्रवादी कॉग्रेसने मोठा गौप्यस्फोट केला आहे की ही कार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे चांगले संबंध असलेल्या एका बांधकाम व्यवसायिकाची आहे.

राष्ट्रवादीने फेसबूक पोस्टद्वारे हा दावा केला आहे. राष्ट्रवादीने फेसबूक पोस्टमध्ये लिहीले आहे की, मनसुख हिरेन तपासात महाराष्ट्र एटीएसच्या नव्या सुगाव्यामुळे कहानी में ट्विस्ट आला आहे. एटीएसने तपासादरम्यान जी व्होल्वो कार ताब्यात घेतली आहे ती बिल्डर मनिष भतिजा यांची असल्याचे समजते.

मनिष भतिजा यांचे राजकीय व व्यावसायिक लागेबांधे भाजपा नेत्यांकडे जातात. याच मनिष भतिजा यांच्या पॅराडाइज ग्रुपला फडणवीस मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळानजीकची सोन्यासारखी २४ एकर प्राइम लँड पडेल भावाने दिली होती.

इतका हा मनिष भतिजा फडणवीसांच्या जवळचा आहे आणि फडणवीसांचे अत्यंत लाडके ज्यांना त्यांचा ब्लू आइड बॉय म्हणून ओळखले जाते त्या प्रसाद लाड यांचे हे मनिष भतिजा व्यावसायिक पार्टनर असल्याचे समजते.

नवी मुंबईतील सुमारे १७६७ कोटी रुपयांची ही जमीन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या ३.६ कोटी रुपयांत मनिष भतिजा यांच्या घशात घातली, असा आरोप सातत्याने झाला होता. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठीच खळबळ उडाली होती.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माध्यमांमध्ये वेगवेगळ्या राजकीय भूमिका उठत असताना पोलिस तपासात मात्र वेगळी तथ्ये सामोरी येत आहेत. या प्रकरणातले इतर पुरावे आता महाराष्ट्र पोलिसांच्या तपासामुळे बोलू लागले आहेत, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

महत्वाच्या बातम्या
कृणाल पांड्याची पहील्याच सामन्यात ३१ चेंडूत ५८ धावांची धडाकेबाज खेळी; बापाच्या आठवणीत भर मैदानात रडला..
केवळ एवढ्याश्या गोष्टीसाठी कंगना राणावत आणि संजय दत्तची मैत्री तुटली होती
सोने खरेदीची सुवर्णसंधी! होळीच्या आधीच सोनं स्वस्त, जाणून घ्या तोळ्याचा दर
दिल्लीत परमबीर सिंग कुणाला भेटले? वेळ येताच संपूर्ण माहिती उघड करू; नवाब मालिकांचा इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.