पाच तारखेलाच पगार झाला पाहिजे म्हणणाऱ्या शिक्षकांना अजित पवारांनी ‘या’ शब्दांत खडसावले

मुंबई | लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक शाळांच्या शिक्षकांनी वेतनबाबत केलेल्या मागणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. ‘करोना काळात राज्याची आर्थिक स्थिती अडचणीत आली होती. मात्र या काळातही १२ हजार कोटींचे वेतन शिक्षकांना ५ महीने घरी बसून दिले,’ असे ते म्हणाले.

माळेगाव बुद्रूक येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, शंकर सहकार संकुलासह विविध विकास कामांच्या उद्‌घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘खरेतर मला वाटत होते की मी अर्थमंत्री असल्याने माझी पैशाची ओढाताण पाहून हे शिक्षकमंडळी आम्हाला अर्धा पगार द्या म्हणण्यासाठी येतील, असे वाटले होते.’

मात्र त्यांनी तर आमचा पाच तारखेलाच पगार झाला पाहिजे, अशी निवेदनाद्वारे मागणी केली. अरे…बाबांनो जरा इतरांच्या वेदनांचा विचार करणार आहात की नाही?” अशा शब्दांत शिक्षकांच्या मागण्यांबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, राज्यात शेती पंपाचे थकीत वीजबिल 40 हजार कोटींच्या घरात आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी सरकारने पन्नास टक्के सवलतीवर थकबाकी वसुली योजना जाहीर केली आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे देखील ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
अर्थसंकल्पावर राहुल गांधींनी केली जोरदार टीका, ‘देशाची संपत्ती गरीकांच्या हातात नसून…’
‘गरिबाला आणखी गरीब करु नका, महाराष्ट्राच्या वाट्याचे जीएसटीचे पैसे लवकरात लवकर द्या’
सत्तेवर आल्यापासूनची मोदी सरकारची सर्वात खराब कामगिरी; ७२ टक्के जनता म्हणतेय…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.