“त्यावेळी तुम्हाला कुणी थांबवलं होतं का?”; अजित पवारांचा सेलिब्रिटींना सवाल

मुंबई | दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटल्यानंतर भारतीय कलाकार आता ट्विटरच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया देत आहेत. ट्विट करणाऱ्या सेलिब्रिंटींना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सवाल उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे.

ते पुण्यात मध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘सेलिब्रेटींना माझी विनंती आहे, दोन-तीन महिने झालेत शेतकरी तिथे बसलेले आहेत. त्यावेळी का नाही काही मत व्यक्त केले. कुणी थांबवलेलं होते. आता बाहेरच्या कुठल्या सेलिब्रेटीला वाटलं की, इथं भारतातल्या शेतकऱ्यांबद्दल लक्ष दिलं गेलं पाहिजे. ते त्यांचं मत आहे,’ असे ते म्हणाले.

‘प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. ते मत व्यक्त केल्यावर इथं कुणाकुणाला जाग यायला लागली. इथं कुणी थांबवलं होतं का? आज शेतकरी तिथे थंडी वाऱ्यात बसलेला आहे, हे दिसलं नाही,’ असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, ‘लोकशाहीत चर्चा करायची असते. चर्चेतून मार्ग काढायचा असतो. पण ते काहीच त्यांनी केलं नाही. एक ट्विट झाल्यानंतर सेलिब्रेटींनी काय ट्विट केलं हेही आपण पाहिलं,” अशा शब्दात अजित पवारांनी सेलिब्रिटींना सुनावले.

महत्त्वाच्या बातम्या
‘आंदोलनातील २०० शेतकऱ्यांना अटक, पण दीप सिद्धू अजूनही मोकाट का?’
धमकीचा फरक पडत नाही, शेतकऱ्यांना पाठिंबा सुरूच राहील; ग्रेटा आक्रमक
शरद पवारांच्या ‘त्या’ गुगलीने ठाकरे सरकारमध्ये उलथापालथीचे संकेत? वाचा सविस्तर   

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.