NCP : एक महिन्यांपासून रखडलेला मंत्रिमंडळाचा शपथविधी अखेर आज पार पडला. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजप मिळून एकूण १८ नेत्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाने शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राष्ट्रवादी पक्षाने शिंदे – फडणवीस सरकार हे भ्रष्टाचार, घोटाळेबाज, खंडणीखोरांची मांदियाळी असल्याचा आरोप केला आहे. आज शपथ घेतलेल्या मंत्र्यांवर राष्ट्रवादीने आरोप केले आहेत. ट्विटरवर पोस्ट करत हे आरोप केले गेले आहेत.
आज झालेल्या मंत्र्यांच्या शपथविधीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. आज महाराष्ट्रात बेकायदेशीर शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी झाला. मागील ४० दिवसांपासून विरोधकांनी आणि जनतेनी आवाज उठवला आणि यातून राज्यातील जनता आक्रोश करेल म्हणून नाईलाजाने हा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला, असे ते म्हणाले.
तसेच या मंत्रीमंडळात सर्व चेहरे हे भ्रष्टाचार, आणि अनियमित कामांसाठी ओळखले गेलेले चेहरे आहेत. अब्दुल सत्तार हे टीईटी घोटाळ्यातील आरोपी आहेत तर संजय राठोड हे एका मुलीच्या हत्या प्रकरणात आरोपी आहेत. बोगस पदव्या, वादग्रस्त वक्तव्य, अधिकाऱ्यांना दमदाटी, महाराष्ट्र विकत घेण्याची भाषा करणारे तानाजी सावंत असे लोक मंत्रीमंडळात आहेत, असा आरोप रविकांत वरपे यांनी केला.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या घडवलेल्या सुसंकृत राजकारणाला बट्टा लावून महाराष्ट्राची देशात बदनामी या शिंदे गट-फडणवीस सरकारकडून झाली आहे, असेही ते म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सरकारच्या अन्यायी कारभाराला ताकदीने विरोध करेल, असा इशाराही वरपे यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
WhatsApp Feature : व्हॉट्स ऍपने जारी केले काही भन्नाट फिचर्स, पाहून युजर्स म्हणाले, ‘आम्ही असा विचारही केला नव्हता’
Nigar Sultana : बॉलिवूडची ‘ती’ अभिनेत्री जी मधूबाला अन् ऐश्वर्यापेक्षा होती सुंदर, नाव वाचून व्हाल थक्क
Tata Motors: टाटाने लॉन्च केली आतापर्यंतची सर्वात स्वस्त CNG कार, कमी किंमतीत मिळणार शानदार फिचर्स
Eknath Shinde : बाबो! शिंदे सरकारमधील सगळेच मंत्री करोडपती, एकतर आहे ४४१ कोटींचा मालक






