सुशांत केसमध्ये सुशांतच्या बहीणीचीही चौकशी करणार एनसीबी; तपासाला पुन्हा टर्न

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. सीबीआय या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. NCB ने या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन शोधल्यानंतर अनेक खुलासे झाले आहेत. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती या दोघांना या प्रकरणात अटक केली आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे या प्रकरणात आता सुशांतच्या बहिणीचे नाव समोर आले आहे. सुशांतची बहिणदेखील या ड्रग्स पार्टीत असायची असा आरोप केला जात आहे. एनसीबीकडून सुशांतची मॅनेजर श्रुती मोदीची चौकशी सुरू आहे.

श्रुतीचे वकिल अशोक सरोगी यांनी आरोप केला आहे की, सुशांतची बहीण ड्रग्स पार्टीत असायची, ती ड्रग्स घ्यायची. आता सुशांतची कोणती बहीण ड्रग्स घ्यायची याबाबत त्यांनी सांगितले नाही, तिचं नाव अद्याप समोर आलेले नाही. एनसीबीकडून तिचीही चौकशी होणार आहे.

ही पहिलीच वेळ नाहीये की, सुशांतच्या बहिणीवर असे गंभीर आरोप झाले असतील. याआधीही सुशांतच्या बहिणीवर रियाने गंभीर आरोप लावले होते. रियाने सांगितले होते की, ८ जूनला सुशांतचं घर सोडून गेल्यानंतर सुशांतची बहीण मितु सुशांतबरोबर राहायला गेली होती.

तसेच सुशांतची दुसरी बहीण प्रियांका सिंह हिने सुशांतला औषधांचं बोगस प्रीस्क्रिप्शन दिल्याचा रियाने आरोप केला आहे. याविरोधात तिने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. आता या प्रकरणातील ड्रग्सच्या दिशेने तपास सुरू असताना सुशांतच्या बहिणीचे नाव आल्याने पुढे तिचीही चौकशी होऊ शकते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.