एनसीबीने घेतली सुशांतच्या फार्महाऊस ची झडती सापडल्या ‘या’ गोष्टी

मुंबई| सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला दिवसेंदिवस नवीन वळण येत आहे. सध्या सुशांतच्या ड्रग्स संबंधांबाबत कसून चौकशी होत आहे. एनसीबीला या तपासात अनेक धागेदोरे हाती येत आहेत. एनसीबी पथकाकडून सुशांतच्या फार्महाऊसची झडती घेण्यात आली. यामध्ये एनसीबीला ड्रग्स घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू सापडल्या आहेत.

या तपासात एनसीबीच्या पथाकाकडून काही जबाब देखील नोंदविण्यात आले आहेत. या तपासात हुक्का पिण्याच्या काही वस्तू सापडल्या आहेत. एनसीबी ड्रग्स कनेक्शन बाबतीतही कसून चौकशी करत आहे. या चौकशी अंतर्गत रिया चक्रवर्ती व शोविक चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे.

रिया व शोविक सोबतच अजून सहा ते सात जणांना अटक करण्यात आली आहे.यापूर्वी एनसीबीने आपल्या रिमांड कॉपीमध्ये दावा केला होता की, रिया आणि इतर साथीदार सुशांत सिंह राजपूत यांच्या सांगण्यावरून ड्रग्स मागवत असे, आणि याचा जबाब देखील रियाने चौकशी दरम्यान दिला आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात संबंध असलेल्या अनेक ड्रग्स पेडलर्सला अटक करण्यात आली आहे. तसेच, बॉलिवूडमधील ड्रग्स कार्टेलचासुद्धा संबंध समोर आला आहे.

सोमवारी एनसीबीने हाय-फाय ड्रग्स पार्टीचा संबंध असलेल्या शोविकचा मित्र सूर्यदीप मल्होत्रा याला ताब्यात घेतले आहे. सूर्यदिपच्या चौकशीमध्ये एनसीबीला आता नवीन माहिती मिळेल, ज्यात बर्‍याच नवीन गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.