NCBच्या चौकशीत आरोपीचा मोठा खुलासा; K J सुशांतला ड्रग्स सप्लाय करत होता

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित रिया चक्रवर्ती हिला अंमली पदार्थांच्या सेवनासह इतर आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) ही कारवाई केली. दरम्यान, न्यायालयाने रियाला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.

तसेच नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग्स प्रकरणात काही दिवसांपूर्वी करमजीत सिंग आनंदला अटक केली आहे. एनसीबीच्या चौकशीत करमजीतने अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहे. यामुळे तपासात देखील मोठ्या प्रमाणात वेग आला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार करमजीत सुशांतला ड्रग्स सप्लाय करत असल्याचे समजत आहे. तसेच एनसीबीच्या चौकशीत करमजीतने स्वत: अनेक वेळा सुशांतला ड्रग्स सप्लाय केले असल्याचे सिद्ध केले आहे.

याचबरोबर एनसीबीने केलेल्या चौकशीत अनेक महत्त्वाचे धागे दोरे करमजीतने दिलेल्या माहितीमुळे मिळाले आहे. यामधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बॉलिवूडमधील अनेकजण करमजीतचे क्लाइंट्स होते.

दरम्यान, चौकशीत एकूण १५० नावांचा खुलासा केला आहे. या 150 लोकांच्या लिस्टमध्ये केजेचे हाय प्रोफाइल क्लाइंट्स आणि मोठ्या ड्रग पेडलर्सची नावे आहेत. या मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील गुंता अधिकच वाढला असल्याचे दिसते आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या 

‘खबरदार माझी तुलना रिया चक्रवर्ती सोबत केली तर…’

शोविक चक्रवर्ती आणि ड्रग्स डीलरमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट उघड; झाला मोठा खुलासा…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.