सुशांतला ड्रग्ज सप्लाय करणारा सापडला; कितीवेळा ड्रग्ज दिले होते तेही सांगितले

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित रिया चक्रवर्ती हिला अंमली पदार्थांच्या सेवनासह इतर आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) ही कारवाई केली. दरम्यान, न्यायालयाने रियाला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.

तसेच नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग्स प्रकरणात काही दिवसांपूर्वी करमजीत सिंग आनंदला अटक केली आहे. एनसीबीच्या चौकशीत करमजीतने अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहे. यामुळे तपासात देखील मोठ्या प्रमाणात वेग आला आहे.

याचबरोबर एनसीबीने केलेल्या चौकशीत अनेक महत्त्वाचे धागे दोरे करमजीतने दिलेल्या माहितीमुळे मिळाले आहे. यामधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बॉलिवूडमधील अनेकजण करमजीतचे क्लाइंट्स होते.

हाती आलेल्या माहितीनुसार करमजीत सुशांतला ड्रग्स सप्लाय करत असल्याचे समजत आहे. तसेच एनसीबीच्या चौकशीत करमजीतने स्वत: अनेक वेळा सुशांतला ड्रग्स सप्लाय केले असल्याचे सिद्ध केले आहे.

या चौकशीत एकूण १५० नावांचा खुलासा केला आहे. या 150 लोकांच्या लिस्टमध्ये केजेचे हाय प्रोफाइल क्लाइंट्स आणि मोठ्या ड्रग पेडलर्सची नावे आहेत. या मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील गुंता अधिकच वाढला असल्याचे दिसते आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या 

अजून एक धक्का! सुशांतच्या फार्महाऊसवर पार्टीसाठी आली होती श्रद्धा कपूर

सुशांत आणि रियासाठी परदेशातून मागवले जात होते ड्रग्स, ‘या’ पत्यावर व्हायची डिलिव्हरी

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.