नयनतारा आणि विघ्नेश ही जोडी पाहिली तर ते भारतीय चित्रपटसृष्टीतील जोडप्यांपेक्षा वेगळे आहेत. सहसा, सेलेब्स लग्नानंतर थेट हनीमून ट्रिपला जातात. दुसरीकडे, दक्षिणेतील हे जोडपे सात फेरे घेतल्यापासून सतत मंदिरांना भेट देत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आजकाल नयनतारा आणि विघ्नेश मंदिरांमध्ये अन्नदान करत आहेत आणि गरजूंना जेवणही देत आहेत.
आता ते दोघे केरळमधील चेट्टीकुलंगारा देवी मंदिरात पोहचले आहे, जिथे ते दोन आठवडे राहून विशेष पूजा करणार आहेत. नयनतारा आणि विघ्नेश यांनी लग्नानंतर हजारो अनाथ मुले आणि वृद्धांना जेवण दिले आहे. या जोडप्याने तामिळनाडूमधील अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांना स्वादिष्ट दक्षिण भारतीय अन्न वाटप केले आहे.
गरजूंना अन्नदान करताना आणि नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, अनाथ मुले आणि वृद्धांकडून नयनतारा आणि विघ्नेश सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद घेताना दिसत आहेत.
कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून, या जोडप्याने त्यांच्या लग्नाला अधिक खास बनवण्यासाठी 18,000 मुले आणि तामिळनाडूमधील 1 लाख लोकांसाठी जेवणाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता. हे जोडपे केवळ त्यांच्या चाहत्यांचीच मनं जिंकत नाहीये तर देवासोबतच गरजू लोकांचे आशीर्वादही मिळवत आहेत.
महाबलीपुरममध्ये लग्न झाल्यानंतर नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांनी आदल्या दिवशी तिरुपती मंदिरात दर्शन घेतले. नवविवाहित जोडपे हातात हात घालून चालताना दिसत होते आणि त्यांच्या नवीन प्रवासासाठी आशीर्वाद घेण्यासाठी येथील मंदिरात पोहोचले होते. महाबलीपुरममधील एका आलिशान हॉटेलमध्ये त्यांनी हा सोहळा आयोजित केल्याने त्यांचा विवाहही शहरात चर्चेचा विषय बनला आहे.
या भव्य लग्नात शाहरुख खान, जयम राम रवी, ऍटली, रजनीकांत, बोनी कपूर, कार्ती, थलपथी विजय आणि मणिरत्नम यांसारख्या सेलिब्रिटींसह काही मोठी नावे होती. 11 जून रोजी दुपारी, नयनतारा आणि विघ्नेश शिवन चेन्नईमध्ये मीडिया व्यक्तींना भेटले, जिथे दोघांनी त्यांच्यासोबत जेवण केले.
महत्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंना पुन्हा मिळणार शिवसेनेचे नाव आणि चिन्ह? सर्वात मोठे कारण आले समोर
उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने नाही, तर एकनाथ शिंदेंनीच दिला मोठा दिलासा, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
…म्हणून मी १२ आमदारांच्या यादीवर सही केली नव्हती; भगतसिंग कोश्यारींचा मोठा खुलासा