अमित शहांनी चेतावणी दिल्यांनतर नक्सली बिथरले, पत्र जारी करून म्हणाले..

शनिवारी छत्तीसगढमधील बस्तर येथे नक्सलवाद्यांनी भारतीय जवानांवर हल्ला केला. त्यामध्ये भारताचे २२ जवान शहीद झाले. त्यानंतर पुर्ण देशातील वातावरण तापलेले आहे. नक्सलवाद्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगढ जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि जखमी जवानांची हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. जवानांना संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, सरकार नक्सलवाद्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे नियोजन आखत आहे.

अमित शहा तेथून परतल्यानंतर नक्सलवाद्यांनी एक पत्र जारी करून थेट अमित शहांवरच टीका केली आहे. त्या पत्राला नक्सलवाद्यांनी साहसिक गुरिल्ला योद्धाओं को लाल सलाम! अमर शहिद गुरिल्ला योद्धाओं को जोहर! या पत्रात जे नक्सलवादी जखमी झाले आणि मारले गेले त्यांना शहीद योद्धा संबोधित करण्यात आले आहे.

पत्रात लिहीले आहे की या सगळ्या मृत्युंना जबाबदार केंद्र सरकार आणि मुख्य म्हणजे गृह मंत्रालय जबाबदार आहे. अमित शहा म्हणाले होते की जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार आहे. त्यावर नक्सलवाद्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

अमित शहा गृहमंत्री आहेत तरीही बदल्याची भाषा करतात. त्याचे आम्ही खंडन करतो. अमित शहा बिथरले आहे आणि त्याची फॅसिस्ट प्रवृत्ती जाहीर करत आहेत. अमित शहा कोणा कोणाकडून बदला घेणार? सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरले आहे.

लोकांना कोरोना महामारीपासून वाचवायचे सोडून लोकांचे लक्ष माओवाद्यांकडे केंद्रित करत आहे. निवडणूकीवर त्यांचे लक्ष आहे. त्यांना लोकांच्या ऐवजी सत्तेची काळजी आहे. स्वताची लढाई लढणाऱ्या जनतेला आतंकवादी घोषित करणे काही नवीन गोष्ट नाही असे त्या पत्रात लिहीले आहे.

महत्वाच्या बातम्या
अजब उपवास! २ महिने फक्त बिअर प्यायला आणि घटवलं १८ किलो वजन, आता म्हणतोय..
मोकळ्या झोपड्यांत घुसले जवान पण तिथेही टाकलं होतं जाळं; वाचा कसे झाले २२ जवान शहीद
वाझे कोणाला किती पैसे द्यायचा? एआयएला भेटली सगळी कागदपत्रे; होणार सगळी पोलखोल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.