अमित शहांना नक्षलवाद्यांचे पत्रकातून थेट आव्हान; ‘कोणा-कोणाचा सूड घेणार?’

मुंबई : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत शनिवारी झालेल्या धुमश्चक्रीत शहीद झालेल्या जवानांची संख्या आता २२ वर पोहोचली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात ज्या ठिकाणी जवानांवर हा हल्ला झाला त्या ठिकाणीची अमित शाह यांनी पाहणी केली.

तसेच शहीद जवानांना देशाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, आणखी ताकदीने लढू आणि या लढाईत आपला विजय निश्चित होईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. जखमी जवानांची विचारपूर केली आणि ते दिल्लीला रवाना झाले.

यानंतर नक्षलवाद्यांनी पत्रक काढून अमित शहांना थेट आव्हान दिलं आहे. ‘अमित शहा हे देशाचे गृहमंत्री असूनही ते सूडाची भाषा करत आहेत आणि हे घटनाबाह्य आहे. पण ते कोणा-कोणाचा बदला घेणार,’ असे नक्षलवादी पत्रकात म्हणाले.

माकपचा प्रवक्ते अभय याने हे पत्रक जारी केले आहे. सरकार आणि सुरक्षा दलांविरोधात टॅक्टिकल काउंटर ऑफेन्सिव मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत त्यात १०० हून अधिक पोलीस जखमी झालेत किंवा ठार झालेत. सरकारच्या दडपशाहीविरोधात २६ एप्रिलला भारत बंदचं आवाहन केले आहे.

मात्र सरकार करोनापासून जनतेची सुरक्षा करण्याऐवजी नक्षलवाद्यांना भीती दाखवत आहेत. सरकारच्या कारवाई विरोधात अशा प्रकारचे हल्ले या पुढेही करत राहणार. सरकार आम्हाला दहशतवादी समजते. पण आमची लढाई ही सरकारी यंत्रणेद्वारे साधन सामग्रीच्या होणाऱ्या लुटीविरोधात आहे, असं नक्षलवाद्यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

दरम्यान, ‘आम्हाला पोलिसांविरोधात लढाई करायची नाही. पण ते सरकारी यंत्रणेचे हत्या म्हणून आमच्यासमोर येतात त्यावेळी आम्हाला हल्ला करावाच लागतो. पोलीसही शोषित आहेत. आपल्या मुलांना पोलिसात भरती करू नका, असे आवाहनही नक्षलवाद्यांनी केलं.

महत्त्वाच्या बातम्या 

‘चित्राताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आणि ताई विचारतायत नवा वसुली मंत्री कोण?’

मोकळ्या झोपड्यांत घुसले जवान पण तिथेही टाकलं होतं जाळं; वाचा कसे झाले २२ जवान शहीद

तुम्ही निवडणूक जिंकायच्या कॅटेगरीत बसत नाही म्हणत पवारांनी नाकारले होते तिकीट; आज गृहमंत्री केलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.