एअर होस्टेसचा आशिक झाला नवाजुद्दीन, फ्लर्ट करताना कॅमेऱ्यात कैद; पहा व्हिडीओ

आज नवाजुद्दीन सिद्दीकी हे नाव बॉलिवूडच्या सर्वोत्तम कलाकारांच्या यादीत आघाडीच्या काही नावांमध्ये आले आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नवाजुद्दीन अतिशय सामान्य आयुष्य जगताना दिसतो. मात्र आता समोर आलेला व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना थक्क करणारा आहे.

नवाजुद्दीन हे अगदी साधे व्यक्तीमत्व असेल असा अनेकांचा समज झाला आहे. त्याच्या चाहत्यांचा हा समज आज दुर होईल यात शंका नाही. कारण व्हिडीओत तो खूप मनमौजी असल्याचे दिसत आहे. नवाजचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना भलताच पसंत पडत आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो त्याच्या शांत आणि सरळ स्वभावापेक्षा वेगळा वागत आहे. व्हिडीओमध्ये तो विमानात असल्याचे दिसते आहे. त्याठिकाणी नवाज एका तरुणीसोबत बोलताना पाहायला मिळतो.

नवाज चक्क विमानातील फ्लाइट अटेंडेंटसोबत फ्लर्ट करताना दिसतो. नवाज आणि तरुणीचा एकमेकांसोबत बोलतानाचा अनोखा अंदाज व्हिडीओत पाहायला मिळतो आहे. नवाज एअर होस्टेसला बघून हसताना दिसला. तर नवाजच्या चेहऱ्याकडे पाहून एअर होस्टेस हसत होती. जसा काय नवाज या तरुणीचा आशिकच झाला आहे असं व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल.

कॅमेऱ्यात कैद झालेला हा संपुर्ण प्रकार नवाजच्या चाहत्यांसमोर येताच तो व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. सोशल मीडियावर नेटकरी व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. नवाज आणि एअर होस्टेस या दोघांची चांगलीच मैत्री झाली असल्याचे मत चाहते व्यक्त करत आहेत.

नवाजुद्दीन सिद्दिकीला चर्चेत राहणं फार आवडत नाही. त्याने अनेक चित्रपट केले आहेत. तसेच वेगवेगळ्या सीरिजमध्ये त्याने काम केले आहे. मंटो, फोटोग्राफर, ठाकरे, मांझी, रमन राघव २.०, गॅग्स ऑफ वासेपूर या चित्रपटात त्याने विषेश भूमिका साकारल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-
सेल्फी काढताना विसरला भान; मागून येणाऱ्या मालगाडीचे वाजवला हॉर्न अन..
पाकिस्तानचे मौलाना तारिक जमील झाले सलमानचे फॅन; म्हणाले, स्वर्गाच्या वाटेने जातोय सलमान खान
वयाची पन्नासी पार करुन देखील २० वर्षांच्या दिसतात ‘या’ अभिनेत्री; जाणून घ्या त्यांच्या फिटनेसचे सीक्रेट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.