Share

नवाजुद्दीन सिद्दीकीचा हटके अंदाज; लक्झरी कार सोडून केला लोकलने प्रवास, व्हिडिओ व्हायरल

nawaj

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी(Nawajuddin Siddqui) हा डाउन टू अर्थ म्हणून ओळखला जातो. नवाजुद्दीन नेहमीच लोकांना आणि समाजाला जवळून समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयात देखील ही गोष्ट दिसून येते. अलीकडेच नवाजुद्दीन सिद्दीकीने मुंबई लोकलमध्ये प्रवास केला. त्याचा व्हिडिओ एका चाहत्याने रेकॉर्ड केला आहे.(nawajuddin siddiqui different style trave with local train)

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा लोकलने प्रवास करतानाचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या साधेपणाचे कौतुक केले आहे.

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने कोणी ओळखू नये म्हणून चेहऱ्यावर मोठा मास्क लावला आहे. तसेच डोक्यावर रुमाल बांधला आहे आणि डोळ्यांवर काळा चष्मा देखील घातला आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुंबईतील एका रेल्वे स्टेशनवर फिरत होता. त्यावेळी रेल्वे स्टेशनवरील एका चाहत्याने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला ओळखले.

त्यानंतर चाहत्याने मोबाइलमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीचे शूटिंग करण्यास सुरवात केली. त्यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याला विरोध करत शूट न करण्यास सांगितले. पुढे या व्हिडिओमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुंबईच्या एका लोकलमध्ये बसलेला दिसतो. त्यावेळी ट्रेनमध्ये भरपूर गर्दी होती. पण कोणीहीअभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला ओळखले नाही.

मुंबई लोकलच्या या प्रवासात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आजूबाजूच्या गोष्टींचे निरीक्षण करत होता. एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने लोकलने प्रवास केला आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या अभिनयासाठी नेहमीच ओळखला जातो. अभिनेता नवाज सिद्दीकीचा हिरोपंती हा नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री तारा सुतारीया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकतेच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने मुंबईत नवीन घर घेतले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने वडिलांच्या आठवणीत या घराचे नाव ‘नवाब’ असे ठेवले आहे. आगामी काळात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे ५ ते ६ सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
हिट चित्रपट बनवण्याची मशीन आहे एस एस राजामौली, २१ वर्षात दिलेत २१ सुपरहिट चित्रपट
धाडस तर बघा…! दिवसाढवळ्या कार्यक्रमात शिवसेना नेत्याच्या खिशातून काढला हजारोंचा बंडल, VIDEO झाला व्हायरल
कौतुकास्पद! १७ वर्षीय भारतीय तरुणाला गुगलकडून 1.25 कोटीचं पॅकेज, ‘या’ पदावर होणार नियुक्ती

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now