बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी(Nawajuddin Siddiqui) हा डाउन टू अर्थ म्हणून ओळखला जातो. नवाजुद्दीन नेहमीच लोकांना आणि समाजाला जवळून समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयात देखील ही गोष्ट दिसून येते. अलीकडेच नवाजुद्दीन सिद्दीकीने मुंबई लोकलमध्ये प्रवास केला. त्याचा व्हिडिओ एका चाहत्याने रेकॉर्ड केला आहे.(nawaj uddin siddiqui mumbai local journey)
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा लोकलने प्रवास करतानाचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या साधेपणाचे कौतुक केले आहे.
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने कोणी ओळखू नये म्हणून चेहऱ्यावर मोठा मास्क लावला आहे. तसेच डोक्यावर रुमाल बांधला आहे आणि डोळ्यांवर काळा चष्मा देखील घातला आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुंबईतील एका रेल्वे स्टेशनवर फिरत होता. त्यावेळी रेल्वे स्टेशनवरील एका चाहत्याने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला ओळखले.
त्यानंतर चाहत्याने मोबाइलमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीचे शूटिंग करण्यास सुरवात केली. त्यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याला विरोध करत शूट न करण्यास सांगितले. पुढे या व्हिडिओमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुंबईच्या एका लोकलमध्ये बसलेला दिसतो. त्यावेळी ट्रेनमध्ये भरपूर गर्दी होती. पण कोणीहीअभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला ओळखले नाही.
मुंबई लोकलच्या या प्रवासात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आजूबाजूच्या गोष्टींचे निरीक्षण करत होता. एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने लोकलने प्रवास केला आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या अभिनयासाठी नेहमीच ओळखला जातो. अभिनेता नवाज सिद्दीकीचा हिरोपंती हा नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री तारा सुतारीया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकतेच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने मुंबईत नवीन घर घेतले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने वडिलांच्या आठवणीत या घराचे नाव ‘नवाब’ असे ठेवले आहे. आगामी काळात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे ५ ते ६ सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
चहलचा IPL मध्ये धिंगाना! बायको धनश्रीला मैदानावरच दिला किस; पहा व्हायरल व्हिडीओ
‘या’ कायद्याच्या आधारे ईडी करत आहे आघाडीच्या मंत्र्यांवर कारवाया; जाणून घ्या काय आहे PMLA कायदा
“सुख म्हणजे नक्की काय असतं” मालिकेतील अभिनेता विवाहबंधनात; ‘या’ कलाकारांची हजेरी