मुंबई | अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अखेर अटक करण्यात आली आहे. एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांनी ही माहिती दिली आहे. अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडून करण्यात आलेल्या या कारवाईने राष्ट्रवादी सोबतच महाविकास आघाडी सरकारमध्ये खळबळ उडाली आहे.
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर करण सजनानीच्या चौकशीदरम्यान समीर खान यांचे नाव समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यानंतर एनसीबीने समीर खान यांना समन्स पाठवले. त्यानुसार आज सकाळी समीर खान यांची एनसीबीकडून तब्बल १० तास चौकशी कसून चौकशी करण्यात आली.
ड्रग्जप्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे २० हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना २० हजार रुपये गुगल पेने पाठवल्याची माहिती मिळत आहे. नवाब मलिक यांची मुलगी निलोफर हिचे लग्न समीर खान यांच्याशी झाले आहे.
प्रसिद्ध ‘मुच्छड पानवाला’चे ड्रग्ज प्रकरणात नाव
ड्रग्ज तस्करी प्रकरणात ‘मुच्छड़ पानवाला’च्या मालकाचे नाव समोर आल्याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्यांना समन्स पाठवले आहे. मुंबईतील हाय प्रोफाईल मुच्छड पानवाला NCB च्या रडारवर आहे. एनसीबीने बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनप्रकरणी मुच्छड पानवालाला समन्स बजावला आहे.
मुच्छड पानवाला हा दिया मिर्जाची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला हिच्या संपर्कात होता. राहिला आणि तिच्या बहिणीला अटक करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील केम्प कॉर्नर परिसरात ‘मुच्छड़ पानवाला’चे दुकान आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींसह अनेक जण या दुकानात पान घेण्यासाठी येतात. मुंबईतील प्रसिद्ध उद्योजकही पान खाण्यासाठी ‘मुच्छड़ पानवाला’च्या दुकानात गर्दी करतात.
महत्त्वाच्या बातम्या
बला.त्काराच्या आरोपाने धनंजय मुंडे अडचणीत; घेतली थेट शरद पवारांची भेट
“मुस्लीम व्यक्ती ४-४ विवाह करू शकतात मग धनंजय मुंडेंनी दुसरं लग्न केलं तर चुकीचं काय?”
भाजपाचा हल्लाबोल; ‘गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री राजीनामा देतील वाटत नाही,पण…’