नवाब मलिकांचा आरोप हा हवेतला गोळीबार नव्हता; राऊतांनी पुराव्यादाखल व्हिडीओच दाखवला

मुंबई। आज एनसीबीच्या एका पंचाचा व्हिडीओ समोर आला आहे. यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जेलमधून बाहेर सोडण्यासाठी शाहरुखकडून २५ कोटी मागण्यात आले होते. मात्र यामध्ये धक्कादायक म्हणजे त्यातील ८ कोटी समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा खळबळजनक दावा व्हिडीओत करण्यात आला आहे.

त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर आपल्या परखड मताने ओळखले जाणारे शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपची शाळा घेतली आहे. तसेच टीका देखील केली आहे.

एनसीबीचा आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यानं धक्कादायक आरोप केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटवर व्हिडीओ शेअर करुन चौकशीची मागणी केलीय. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यांकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलीय.

संजय राऊत म्हणाले की, एनसीबीवर नवाब मलीकांचा आरोप हा हवेतला गोळीबार नव्हता अस ते म्हणाले आहेत.“आर्यन खानच्या केसमधील साक्षीदाराला कोऱ्या कागदावर एनसीबीनं स्वाक्षऱ्या करायला लावल्या, सही करायली लावली हे धक्कादायक आहे.

पैशाची मागणी केल्याचेही काही रिपोर्टस आहेत असं समजलं. मुख्यमंत्री ठाकरे म्हणालेले की ह्या केसेस या महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि महाराष्ट्र पोलिसांनी याची स्वत:हून दखल घेत चौकशी करावी”, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत आर्यन खान के.पी.गोसावीच्या फोनवरुन कुणाशी बोलतोय हा प्रश्न निर्माण झालाय. व आता या व्हिडिओनंतर आता एनसीबी अधिकाऱ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत की खरे हे अद्यापही समजलेलं नाही. मात्र आता महाराष्ट्रात अनेक चर्चा रंगत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.