राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कोठडीत आहेत. नवाब मलिक यांनी या प्रकरणात दाद मागण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायालयाने त्यांना दिलासा न देता न्यायालयीन कोठडी कायम ठेवली आहे. यादरम्यान ‘वडिलांना जामीन पाहिजे असेल तर ३ कोटी रुपये द्या’, अशी मागणी नवाब मलिक यांच्या मुलाकडे करण्यात आली आहे.(nawab malik son filed FIR against criminal)
या प्रकरणात नवाब मलिक यांचा मुलगा अमीर मलिक यांनी मुंबईतील विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अमीर मलिकच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणूक आणि आयटी कायद्याच्या कलमान्वये इम्तियाज नावाच्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अमीर मलिकच्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना इम्तियाज नावाच्या व्यक्तीकडून एक ईमेल आला होता. या ईमेलमध्ये लिहिले होते की, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन. पण त्या बदल्यात 3 कोटी रुपयांचे बिटकॉइन हवे आहेत. या व्यक्तीने अमीर मलिक यांना दुबईवरून फोन केला होता.
अमीर मलिक या प्रकरणाबाबत माहिती देताना म्हणाले की, “मी या प्रकरणी एफआयआर दाखल केली आहे, परंतु ही गोपनीय बाब असल्याने मी अधिक माहिती देऊ शकत नाही.” वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणाबाबत सांगितले की, “अमीर मलिक यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आयपीसी कलम ४१९ , ४२० आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने 23 फेब्रुवारी रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून ३ एकर जमीन खरेदी केल्याचा मंत्री नवाब मलिक यांच्यावर आरोप आहे. या व्यवहारासाठी मंत्री नवाब मलिक यांनी ५५ लाख रुपये दिले होते.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या मते या जमिनीची किंमत सध्या ३०० कोटी रुपये आहे. या प्रकरणावरून मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने अटक केली होती. सुरवातीला न्यायालायने ७ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती. पण नंतर न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांना आणखी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मंत्री नवाब मलिक सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
टाटा समूहाचा ‘हा’ शेअर सुसाट, २९ रुपयांवरून गेला थेट २३० रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल
भारतावर पुन्हा कोरोनाचे सावट? आरोग्यमंत्र्यांनी तातडीने बैठक बोलावून दिले ‘हे’ निर्देश
‘ठाकरे’ सिनेमाही महाराष्ट्रात टॅक्स फ्री केला नाही, ‘द काश्मीर फाईल्स’ कुठे घेऊन बसलाय- संजय राऊत