दिल्लीच्या घटनेमागे भाजपचाच हात; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने केलेल्या आरोपाने उडाली खळबळ

मुंबई | काल प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्याने कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले आहे. दिल्लीतील हिंसाचारावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे.

याचाच धागा पकडत भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर हल्ला करणे ही कोणती देशभक्ती आहे, हिंसा सुरू असताना तुमचे तोंड का शिवले होते? असा सवाल उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारवर शेलार यांनी टीका केली होती.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हंटले की, ‘शरद पवार यांनी दिल्लीतील घटना घडल्यानंतर टीका केली होती, त्यांच्याकडून अशी अपेक्षित नाही असे स्पष्टपणे म्हटले होतं. आता शरद पवारांवर टीका करणाऱ्या आशिष शेलार यांना डोकं आहे का? असे मलिक यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, ‘दिल्लीत घडलेली घटनेमागे भाजपचाच हात असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. ज्याच्यामुळे दिल्लीत अशी परिस्थिती उद्भवली आहे.  त्या दीप सिंग सिद्धू याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती आणि कालच्या घटनेमध्ये त्याचा महत्त्वाचा रोल आहे का? याचा खुलासा भाजप का करत नाही, असा सवाल मलिक यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या
शेतकरी आंदोलनात फूट! ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर दोन शेतकरी नेत्यांनी घेतली माघार
पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं का?; निलेश राणेंचा संतप्त सवाल
बलात्का.राच्या आरोपानंतर पहिल्यांदाच बीडमध्ये आलेल्या मुंडेंचं जेसीबीवरुन फुलांची उधळण करत दणक्यात स्वागत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.