‘एन्जॉय’ म्हणत नवाब मलिकांनी क्रांती रेडकरची चॅट केली व्हायरल, उडाली खळबळ

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाबर गंभीर आरोप करत आहेत. समीर वानखेडे यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली. त्यांच्या वडिलांचे नाव दाऊदच आहे. असे त्यांनी याआधी म्हटले होते. आता कॅप्टन जॅक स्परो यांच्यातील चॅट ट्विट करत एन्जॉय अशी प्रतिक्रिया देत क्रांती रेडकर यांना टार्गेट केले आहे .

याआधी ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेलती होती .यावर सुनावणी करताना न्यायालयाने नवाब मलिक यांना आपण आरोप करण्यापासून रोखू शकत नाही. असे म्हटले होते. नवाब मलिक यांनी आज क्रांती रेडकर यांचे चॅट समोर आणले आहेत. यामध्ये क्रांती रेडकर यांना कॅप्टन जॅक स्परो हा नवाब मलिक यांच्या विरोधात पुरावे देण्यासंबंधी चॅट मध्ये बोलत आहेत.

त्यामध्ये जॅक क्रांती रेडकरला माझ्याकडे नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्यासंबंधीचे पुरावे आहेत असे बोलत आहे. त्यावर क्रांती रेडकरनी तुमच्याकडे काय पुरावे ते मला द्या असे म्हटले आहे, त्यावर जॅक नवाब मलिक आणि दाऊद यांचे सोबतचे फोटो माझ्याकडे आहेत. आणि ते मी तुम्हाला देऊ शकतो असे म्हटले आहे.

यावर जॅक यांना ते फोटो पाठवण्याची विनंती क्रांती रेडकर करते,जर फोटो पाठवले तर बक्षीस दिले जाईल असे म्हणते, मात्र जॅक क्रांती रेडकरला राज बब्बर आणि नवाब मलिक यांचा फोटो पाठवतो. यावर क्रांती रेडकर म्हणतात हे तर राज बब्बर आहेत. यावर जॅक राज बब्बर यांना त्यांची पत्नी दाऊद म्हणते असं म्हटलं आहे.

जॅक आणि क्रांती रेडकर यांच्यातील चॅट आज सकाळीच नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ओह…माय गॉड!काय विनोद आहे.आज सकाळीच हे मला सापडलं.तुम्हीही हा आनंद घ्या असे म्हटले आहे. अजूनही समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात एकमेकांन विरोधात आरोप सुरू आहेत.

याआधी समीर वानखेडेचा जन्म दाखला शेअर करत समीर वानखेडे जन्माने मुस्लिम आहेत. आणि त्यांच्या जन्म दाखल्यावर वडीलांचे नाव दाऊद असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले होते. यापुर्वीही ज्ञानदेव वानखडे यांनीही वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन आणि कोर्टातही आपण हिंदू महार असल्याचे सांगितले आहे. आपली पत्नी झाईदा ही जन्मानेच मुस्लीम आहे. असे म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या
कृषी कायदे रद्द झाल्यामुळे मुस्लिम संघटनांना मिळाले प्रोत्साहन, CAA आणि NRC रद्द करण्याबाबत आंदोलने सुरु
रोहित शर्माची कॅप्टनसी या खेळाडूंसाठी ठरतीये धोक्याची? पुर्ण सिरीजमध्ये एकदाही खेळवले नाही
शेअर बाजार कोसळला, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेनेक्स आणि निफ्टी एवढ्या अंकांनी घसरले
ॲड. सदावर्ते राक्षस, तर सदाभाऊ वयोवृद्ध, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून खोत सदावर्ते यांच्यात राडा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.