तौते वादळात नौदलाने बजावली कामगिरी; समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना काढले सुखरूप बाहेर

देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या वादळाने हाहाकार माजला आहे. तौते वादळाने भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठे नुकसान झाले आहे. पण या संकटात पण देशाच्या नौदल विभागाने अभिमान बाळगावा अशी कामगिरी केली आहे.

बाँबे हाय क्षेत्रात उत्खनन करणारी नौका समुद्रात अडकून पडली होती. त्या नौकेतील कर्मचाऱ्यांना वाचविण्याची जबाबदारी नौदलावर देण्यात आली. चक्रीवादळात नौका कशी बशी तग धरून उभी होती.

तग धरून उभ्या असलेल्या नौकेतील तब्बल २६७ जण मदतीची प्रतीक्षेत तग धरून होते. ओएनजीसीचे कर्मचारी एकमेकांच्या आधाराने समुद्रात स्वतःच जीव वाचवायचा प्रयत्न करत होते. ओएनजीसी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत.

ओएनजीसीएचे कर्मचारी सिंह यांनी म्हटले आहे की, १७ तारखेला सायंकाळी ५ वाजल्यापासून रात्री ११ पर्यंत ते पाण्यातच होते. तराफा बुडायला लागला असं दिसल्यावर त्यावर असणाऱ्या प्रमोद यांनी पण समुद्रात उडी मारली.

त्यांनी १७ मेच्या दुपारी उडी मारली आणि स्वतःचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. १८ तारखेला सर्वांच्या मदतीला नौदलाचे विमान आले होते. तेव्हा सकाळी ११ वाजता सर्वाना वाचवण्यात आले.

नौदलाच्या सैनिकांनी कर्मचाऱ्यांना वाचवल्यावर सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला. सर्व कर्मचारी जेव्हा समुद्रात अडकले होते तेव्हा सर्वजण देवाचा धाव करत होते आणि तेवढ्यात नौदलाचे जवान आले. नौदलाने यावेळी पण स्वतःची कर्तबगारी सिद्ध केली आहे.

ताज्या बातम्या
सोलापूरच्या भांगे कुटुंबियांचा नादच नाय! तीन गुंठ्यांत ७५ प्रकारची पिके, कमावतात हजारो

लग्नानंतर वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसणाऱ्यांना सोनालीने झाप झाप झापले, म्हणाली..

किती फिरतोय रे राजा, स्वत:ची काळजी घेऊन काम कर; उद्धव ठाकरेंच्या शब्दांनी साळवींच्या डोळ्यात पाणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.