साखरपुडा झाला, शिदोरी झाली, नवरदेव म्हणाला मुलगी पसंत नाय; मग काय जाम चोपला 

बुलढाणा | आयुष्यातील सर्वात आनंददायी गोष्ट म्हणजे लग्न. आपल्या आयुष्याचा योग्य जोडीदार शोधून मुलगामुलगी विवाहबध्द होतात.  इथूनचं संसाराला खरी सुरूवात होते, लग्नानंतर अनेक जबाबदाऱ्या येऊन पडतात.

लग्न जमवायच्या आधी स्थळ शोधले जातात. त्यानंतर कुठून ओळख निघते का?  नातं जुळतं  का?  पाहिलं जातं. व्हॉट्स अपवर फोटो पाहिले जातात. त्यानंतर बघण्याचा कार्यक्रम होतो. मुलामुलीची पसंती, देवाण घेवाण झाली की लग्नाची तारीख काढली जाते.

लग्न जवळ येत असताना घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. मात्र काही कारणांमुळे लग्न जवळ येताच मोडले तर दोन्ही कुटूंबाला मोठा धक्का बसतो. अशीच एक घटना  बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे.

लग्न जवळ आलं आणि नवरदेवाने थेट मुलीला दोष दिला. अन् लग्न करण्यास नकार दिला.  मग चिडलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी  नवरदेवाला धडा शिकवायचं ठरवलं. नातेवाईकांनी गोड बोलून नवरदेवाला बोलावून घेतले. त्यानंतर एका खोलीत बसवून तुफान चोप दिला आहे.

अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालूक्यातील खापरखेडा गावच्या नितीन सावरकर याचं बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालूक्यातील अलमपुर गावातील मुलीशी लग्न जमलं होतं. लग्नाच्या आधी मुलाने चक्क चार वेळा येऊन मुलगी पाहिली. मुलगी पसंत असल्याचं त्यानं सांगितलं.

त्यानंतर साखरपुड्याचा कार्यक्रम, देण्या घेण्याचा कार्यक्रम थाटात पार पडला. लग्न जवळ आल्याने मुलीच्या घरच्यांनी शिदोरी करण्यास सुरूवात केली. मात्र घरातील आनंदाच्या वातावरणाला गालबोट लागले. नवरदेवाने चक्क मुलीच्या डोळ्यात दोष आहे. मला लग्न करायचं नाय असं  सांगितलं.

लग्न तोंडावर आले असताना नवरदेवाने नकार दिल्याने नवरी मुलीचे नातेवाईक चांगले संतापले. त्यांनी नवरदेवाला धडा शिकवायचं ठरवलं. नातेवाईकांनी गोड बोलून नवरदेवाला कपडे घ्यायचे आहेत असं सांगितलं.  नवरदेवही लगेच कपडे घेण्यासाठी तयार झाला.

मुलीच्या नातेवाईकांनी नवरदेवाला घरात बोलावले आणि मस्त बसायला अंथरून टाकले. त्यानंतर तरूण मुलांनी नवरदेवाला हाताने लाथाबुक्क्यांनी चोप देण्यास सुरूवात केली. त्यानंतर नवरदेव रडू लागला.  घरातील लोकांनी नवरदेवाला पुन्हा घराबाहेर आणून रस्त्यावरच चोप दिला. सोशल मिडियावर सध्या या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
इंडियन आयडलकडून प्रेक्षकांची मोठी फसवणूक, गरीब सायली कांबळेबाबत झाला ‘हा’ धक्कादायक खुलासा
जो बायडन यांच्यावर भारताला मदत करण्याचा दबाव प्रचंड वाढला; कोण आणतय हा दबाव? वाचा..
देशात कोरोनाचा हाहाकार! एकाच दिवसात भाजप आणि काँग्रेसच्या ३ आमदारांचा मृत्यू

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.