मंडपात नवरदेवानी मागितली बुलेट; अन् मग मुलीच्या कुटूंबाने नवरदेवाला आणि बापाला धु धु धुतला

अमेठी | प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणजे लग्न. लग्नामध्ये नवरानवरीच्या कुटूंंबाकडून मोठा खर्च केला जातो. लग्नात मुलीचे आईवडिल होणाऱ्या जावयाची सगळी मागणी पुर्ण करत असतात. मात्र कधी असंही होतं की मुलीचा हूंड्यासाठी छळ करण्यात येतो.

मुलीचे आईवडिल मुलीसाठी जावयाच्या इच्छा पुर्ण करतात. हुंड्यामुळे देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशातच उत्तर प्रदेशमध्ये एका लग्नात नवरदेवाला बुलेट मागितल्यामुळे भर मंडपात चांगलाच चोप देण्यात आला आहे.

अमेठी जिल्ह्यातील केसरिया सलीमपुर गावातील रहिवासी नसीम अहमद यांच्या मुलीचे लग्न ठरले होते. रायबरेली जिल्ह्यातील रोखा गावातील तरूण मोहम्मद अमिर याच्याशी  विवाह  पार पडणार होता.घरात लग्नाची तयारी सुरू झाली.

मुलीच्या वडिलांनी  धुमधडाक्यात लग्न लावून द्यायचं ठरवलं. १७ मे रोजी लग्नसोहळा पार पडला. लग्न पार पडल्यानंतर लग्नाच्या दिवशी काहीतरी घटना घडेल असं कुणाच्याही मनात आलं नव्हतं. लग्नानंतर जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला.

जेवणाच्या कार्यक्रमात नवरदेवाने आणि त्याच्या वडिलांनी हुंडा म्हणून चक्क बुलेट बाईकची मागणी केली. हे ऐकून मुलीच्या वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलीच्या वडिलांनी आधीच नवरदेवाला लग्नात मोटरसायकल दिली होती.

मात्र मोटरसायकल नको आम्हाला बुलेट हवी आहे. असं नवरदेवाच्या वडिलांनी म्हटलं. यानंतरही मुलीच्या वडिलांनी नवरदेवाच्या मागणीला होकार दिला आणि बुकींग करून बुलेट देऊ असं सांगितलं. मात्र नवरदेवाच्या वडिलांनी आताच बुलेट हवी आहे. यावर बसूनच नवरदेव नवरीला सासरी घेऊन जाईन असा हट्ट धरला.

यानंतर नवरदेवाच्या कुटूंबाने नवरीमुलीच्या कुटूंबासोबत वाद घालायला सुरूवात केली. यामुळे लग्नाला उपस्थित असलेले गावातील लोक चांगलेच संतापले.  नवरदेव समजावून सांगूनही ऐकले नसल्याने नवरीच्या कुटूंबाने आणि गावातील लोकांनी नवरदेवाला आणि त्याच्या वडिलांना धु धु धुतला.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते लग्नाच्या ठिकाणी दाखल झाले. यानंतर त्यांनी नवरदेवाला आणि त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी नवरदेवासह कुटूंबातील ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या-
“उध्दव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंचं काम चांगलं; तेच खरे शिवसैनिक, त्यांच्याकडून काहीतरी शिका”
पहा महिलेने कसा केलाय काचेच्या बाटल्यांवर बॅलन्स; व्हिडिओ पाहून तोंडात बोटं घालाल
…म्हणून शाहरुख खानच्या मुलीला डेट करण्याचे धाडस कोणी करत नाही; शाहरुख खानने सांगितले डेटचे सात रुल
जाणून घ्या, देशातील पाच भितीदायक रेल्वे स्टेशनबद्दल आणि त्यांच्या संबंधित असलेल्या घटनांबद्दल

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.