ना मास्क ना सोशल डिस्टनसिंग, खासदार नवनीत राणा यांनी धरला ठेका; पहा व्हिडीओ

केंद्रासह इतर राज्यांनी होळी आणि धुलिवंदन सण साजरा करण्यावर निर्बंध घातले आहेत. तरीही देशभरात अनेक लोक मोठ्या उत्साहाने होळी साजरी करताना दिसत आहेत. याचदरम्यान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की त्यांनी कोरोना नियमांचे उल्लघन केले आहे. त्यामुळे आता सोशल मिडीयावर असा सवाल उठत आहे की खासदारांना वेगळा नियम का? विरोधकांनीही या व्हिडीओवरून नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.

आज होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करण्यासाठी मेळघाटात गेले होते.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वारंवार वाढत आहे आणि प्रशासनानेही लोकांना मास्क घालण्याचे आणि सोशल डिस्टंनसिंग पाळण्याचे आवाहन केले आहे. पण अमरावतीच्या खासदार यांनी मात्र या नियमांचे उल्लघंण केल्याचे दिसत आहे.

दोघांनी मेळघाटात अदिवासियांसोबत होळी खेळण्याची गेल्या ११ वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे. पण हे सर्व करत असताना त्यांना सोशल डिस्टंनसिंगचा आणि मास्क घालण्याचा विसर पडला. दुर्गम असलेल्या मेळघाटात काही जण मास्क घातलेले दिसत होते पण बऱ्याच लोकांनी मास्क घातले नव्हते.

त्यामध्ये नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांचाही समावेश होता. मास्क न घालताच नवनीत राणा यांनी अदिवासियांच्या पारंपारिक नृत्यावर ठेका धरला आणि होळी साजरी केली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर तिखट प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.