Share

जे पाणी गावकरी पितात तेच पाणी पिण्यास नवनीत राणांनी दिला नकार, म्हणाल्या…

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील काही गावांमध्ये दूषित पाणी पिल्यामुळे ग्रामस्थांना अतिसाराची बाधा झाली होती. यावेळी ग्रामस्थांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिसाराची बाधा झाल्यामुळे तीन जणांचा मृत्यू देखील झाला होता. यादरम्यान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.(Navneet Rana refused to drink the same water that the villagers drink)

तसेच खासदार नवनीत राणा यांनी गावकऱ्यांच्या तब्येतीची विचारपूस देखील केली. जे पाणी गावकरी पितात तेच पाणी यावेळी गावातील रहिवाशांनी खासदार नवनीत राणा यांना पिण्यास दिले. यावरून खासदार नवनीत राणा संतापल्या आणि त्यांनी पाणी पिण्यास नकार दिला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मेळघाट परिसरातील पाच डोंगरी, कटकुंभ, कोयलारी आणि चुरणी या गावांमधील लोकांना विहिरीमधील उघड्यावरील दूषित पाणी पिल्यामुळे अतिसाराची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २३१ जणांना अतिसाराची बाधा झाली आहे. यामध्ये काही जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. अतिसाराची लागण झालेल्या गावकऱ्यांवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मेळघाट परिसरातील या गावांना भेट दिली. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी दूषित पाणी पिल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या संदर्भात गावकऱ्यांशी चर्चा देखील केली. दूषित पाणी पाहून तुम्ही मला फोन करायला हवा होता, असे खासदार नवनीत राणा यांनी गावकऱ्यांना सांगितले.

त्यावर गावकरी म्हणाले की, “गाव वसल्यापासून गावकरी याच ठिकाणचे पाणी पित आहेत. पण यापूर्वी सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं नाही. सरपंच देखील आमचे फोने उचलत नाहीत”, अशी तक्रार गावकऱ्यांनी खासदार नवनीत राणा यांच्याकडे केली. यानंतर खासदार नवनीत राणा यांनी सरपंच बदलण्याची मागणी केली.

यावेळी एका सामाजिक कार्यकर्त्याने खासदार नवनीत राणा यांना विहिरीतील दूषित पाणी पिण्यास दिले. यावरून खासदार नवनीत राणा संतापल्या. त्यांनी दूषित पाणी पिण्यास नकार दिला. तुम्ही काय फक्त हनुमान चालिसा वाचण्यासाठीच आहात का? असा सवाल यावेळी सामाजिक कार्यकर्त्याने उपस्थित केला. हनुमान चालिसा वाचून कोणत्याही समस्या सुटत नाहीत, असे सामाजिक कार्यकर्त्याने सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-
VIDEO: भाजप नेत्याचा बेडरूममधील व्हिडीओ महिलेने केला व्हायरल, गंभीर आरोप करत म्हणाली..
मोठी बातमी! महिलेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर श्रीकांत देशमुखांनी दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
मुलाला गिळल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी मगरीसोबत केलं हे भयानक कृत्य, व्हिडिओ आला समोर

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now