अरविंद सावंत यांच्यावर नवनीत राणा यांनी केले गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचे सोमवारी संसदेत पडसाद उमटले. भाजपा खासदारांबरोबरच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव घेत गंभीर आरोप केला.

त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप केला. तसे पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिले. महाराष्ट्रातील प्रश्नांवर संसदेत बोलल्यामुळे सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. याबाबत पोलिसांत तक्रार देण्याची तयारीही राणा यांनी केल्याची माहिती मिळत आहे.

तसेच यावेळी खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीवर अनेक आरोप करत महाराष्ट्रात ताबडतोब राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती.

दरम्यान, खासदार राणा यांनी केलेल्या आरोपांना शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत उत्तर दिलं आहे. ‘हे खोटं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की, त्या मला येता जाता भैया-दादा म्हणून बोलतात. मी ही त्यांच्याशी बोलत असतो. त्यांना समजावून सांगत असतो. उलट त्याच (नवनीत राणा) सगळ्यांना धमकावत असतात,’ असे त्यांनी म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

राष्ट्रवादीने केली परमबीर सिंगांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी…

मुजोर दुकानदारांचे धाबे दणाणले! शिधावाटप दुकानांवर चांगली वागणूक न दिल्यास करता येणार तक्रार

आधी वडील वारले, नंतर आईनेही आत्महत्या केली; तरीही हिंमत न हारता बनला पोलीस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.