Navneet Rana : अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. अमरातीतील एका मुलीला तिच्या पतीने डांबून ठेवल्याची तक्रार त्यांनी केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीबद्दल राजापेठ पोलीस ठाण्यातील पोलिसांना विचारपूस केली असता, त्यांनी आपला फोन कॉल रेकॉर्ड केला असल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
आंतरधर्मीय लग्न झालेल्या एका हिंदू मुलीला तिच्या पतीने डांबून ठेवले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये आणले आहे. परंतु, त्यांना अजूनही मुलीचा शोध लागला नाही. या प्रकरणाची चौकशी करायला एवढा वेळ का लागत आहे?, असा सवाल नवनीत राणा यांनी पोलिसांना केला आहे.
मुलीच्या कुटुंबियांनी या घटनेची माझ्याकडे तक्रार केली आहे. तसेच याबाबत पोलिसांना फोन केला असता माझा फोन कॉल रेकॉर्ड केला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी पोलिसांवर केला आहे. यावरून नवनीत राणा आणि राजापेठ पोलीस ठाण्यातील पोलिसांमध्ये मोठा वाद पेटला आहे.
तुम्हाला माझा फोन कॉल रेकॉर्ड करण्याचे अधिकार कुणी दिले?, असा प्रश्न त्यांनी ठाणेदाराला विचारला आहे. यावेळी पोलीसही त्यांच्याशी जोरजोरात बोलत असल्याचे पाहायला मिळाले. नवनीत राणा पोलीस ठाण्यात आक्रमक झाल्यामुळे पोलीसांनी त्यांना बाहेर काढण्यास सांगितले.
विशेषतः अमरावती जिल्ह्यात लव्ह जिहादचे प्रमाण खूप वाढले असल्याचे राणांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच पोलिसांनी संबंधित मुलीला पोलीस ठाण्यात आणण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. तुम्ही लोकप्रतिनिधींचा फोन कसा काय रेकॉर्ड करू शकता?, असेही त्यांनी पोलिसांना विचारले आहे.
कालपासून माझ्या मुलीचा फोन बंद असल्याचे मुलीच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच पोलीस या प्रकरणाला गांभीर्याने घेत नसल्याचेही नवनीत राणा यांनी सांगितले आहे. या सर्व प्रकारामुळे पोलीस ठाण्यात प्रचंड तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या
‘या’ कारणामुळे २ महिन्यातच मुख्यमंत्री शिंदेंना वैतागले अधिकारी; वाचा नेमकं असं काय घडलं?
…तर आम्ही राज ठाकरेंनाच बाहेर काढू; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने स्पष्टच सांगीतलं
‘आम्हाला नाही, तर तुम्हालाही नाही’, शिंदे गटाने आखली वेगळीच रणनीती, उद्धव ठाकरेंसमोरील अडचणींमद्धे वाढ
पीएसआय भरती घोटाळ्यात भाजप आमदाराने घेतले पैसे; स्वत: कबुली देतं केला मोठा खुलासा, ऑडिओ क्लिप व्हायरल