खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा(Ravi Rana) यांच्यावर दोन गटांमध्ये तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील खार पोलिसांनी याप्रकरणात कारवाई करत राणा दाम्पत्याला अटक केली आहे. याप्रकरणी राणा दाम्पत्याला न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.(Navneet Rana is treated very poorly in jail)
मुंबई पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना तुरुंगात अतिशय वाईट वागणूक दिली जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
आज मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मला मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत राणा यांना तुरुंगात अतिशय हीं दर्जाची वागणूक दिली जात आहे. नवनीत राणा यांना पिण्याचं पाणी देखील दिलं जात नाही.”
“त्यांना वॉशरूमला देखील जाऊ दिलं नाही. हे अतिशय धक्कादायक आहे. लोकशाहीला काळिमा फासणारी ही घटना आहे. आता लोकशाहीबद्दल बोलणारे कुठे आहेत? नवनीत राणांनी याबद्दल वकिलांमार्फत लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. हनुमान चालिसा म्हणण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून एका खासदाराला अटक करण्यात आली आहे”, असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “नवनीत राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमान चालिसा म्हणणे हा राजद्रोह असेल तर तो आम्ही रोज करायला तयार आहोत”, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे.
“पोलीस सरंक्षणामध्ये भाजप नेत्यांवर हल्ले झाले आहेत. अशा हल्ल्यांना आम्ही अजिबात घाबरत नाही. अशा घटना फक्त मुबंईत घडत नसून संपूर्ण महाराष्ट्रात घडत आहेत”, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ठाकरे सरकार भाजप नेत्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘KGF’ मध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता एकेकाळी होता यशचा बॉडीगार्ड, वाचा रंजक कथा
यावर्षीच्या IPL मध्ये एकही मॅच का जिंकत नाही मुंबई इंडीयन्स? रोहीत शर्माने सांगीतले खरे कारण
अटकेनंतर सुटकेसाठी राणा दाम्पत्याने उचललं सगळ्यात मोठं पाऊल; आता थेट…