Navneet Rana : ‘उद्धव ठाकरे म्हणजे आळशी मॅन ऑफ द इयर’

Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या अनेक मुद्द्यांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एका नवीन मुद्द्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.

“आळशी माणूस शोधायचा असेल तर मातोश्रीवर जाऊन शोधावा” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नवनीत राणांचे हे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही सतत एकमेकांवर टीकाटिप्पणी सुरु आहे.

सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे आता नवनीत राणा यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. यातच नवनीत राणांनी सुषमा अंधारे यांना प्रत्यत्तर देताना उद्धव ठाकरेंवरही हल्लाबोल केला.

यावेळी सुषमा अंधारेंविषयी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, मी त्यांना ओळखत नाही. ज्या पद्धतीने त्या टीका करत आहेत, ज्या पद्धतीने त्या अभिनय करत आहेत, ज्या पद्धतीने त्या मॅडम बोलत आहेत. त्यांनी आधी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. नंतर देवेंद्र फडणवीसांना सगळ्यात आळशी माणूस म्हटलं. मला नवल वाटत आहे. त्यांना जर आळशी माणूस शोधायचा असेल तर मातोश्रीमध्ये जाऊन शोधावा, असे त्या म्हणाल्या.

तसेच देवेंद्र फडणवीसजी आणि मुख्यमंत्री हे गेल्या महिन्यांमध्ये उद्धव ठाकरे जेवढे ५६ वर्ष फिरले नसतील तेवढे फिरले आहेत. मला वाटते आळशी माणूस त्यांना शोधायचा असेल तर त्यांनी मातोश्रीमध्ये जाऊन शोधला पाहिजे. ‘आळशी ऑफ दि इअर’ शोधायचा असेल तर पक्षाच्या अध्यक्षांना शोधावे, असेही त्या म्हणाल्या.

शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद अजून ताजा असताना आता नवनीत राणांनी हे वक्तव्य केले आहे. रवी राणा यांनी बच्चू कडूंवर ५० खोके घेतल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर नवनीत राणांनी त्यांना मतभेद सोडून जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याचा सल्ला दिला.

महत्वाच्या बातम्या
narendra modi : ब्रेकींग! महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न कायमचा सुटणार; थेट मोदींची मध्यस्थी, कोल्हापूरात मोठ्या घडामोडी 
sharad koli : शिवसेनेचा गनिमी कावा; अटकेसाठी आलेल्या पोलिसांना चकवा देत शिवसेना नेता फरार
shivsena : जळगावात तुफान राडा! बड्या नेत्याला अटक करायला आलेल्या पोलिसांना भिडले शिवसैनिक
sanjay shirsat : शिंदेगटातील मेन मास्टरमाईंट पुन्हा शिवसेनेत येणार; बड्या नेत्याच्या दाव्याने राज्यात भूकंप