अरविंद सावंत यांनी संसदेच्या लॉबीमध्ये धमकवले; नवनीत राणा यांचा गंभीर आरोप

मुंबई : पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचे सोमवारी संसदेत पडसाद उमटले. भाजपा खासदारांबरोबरच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव घेत गंभीर आरोप केला.

त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप केला. तसे पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिले. महाराष्ट्रातील प्रश्नांवर संसदेत बोलल्यामुळे सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. याबाबत पोलिसांत तक्रार देण्याची तयारीही राणा यांनी केल्याची माहिती मिळत आहे.

तसेच यावेळी खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीवर अनेक आरोप करत महाराष्ट्रात ताबडतोब राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती.

दरम्यान, खासदार राणा यांनी केलेल्या आरोपांना शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत उत्तर दिलं आहे. ‘हे खोटं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की, त्या मला येता जाता भैया-दादा म्हणून बोलतात. मी ही त्यांच्याशी बोलत असतो. त्यांना समजावून सांगत असतो. उलट त्याच (नवनीत राणा) सगळ्यांना धमकावत असतात,’ असे त्यांनी म्हंटले आहे.

नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ चित्रा वाघ मैदानात..
नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी उडी घेतली आहे. नवनीत राणा ताई आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे त्यांनी म्हटलं आहे.

‘व्वा रे बहाद्दर…. महाराष्ट्र नावावर करून घेतलात की काय? विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या, धमक्या कसल्या देताय, असा प्रश्न अरविंद सावंत यांना चित्रा वाघ यांनी विचारलाय. तसेच, आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेकी आहोत तुमच्या सारख्यांच्या धमक्यांना घाबरणाऱ्या नाहीत, असे म्हणत आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत नवनीत कौर ताई, असे त्यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

“खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा”

परमबीर सिंग यांची प्रॉपर्टी किती, जनतेला कळू द्या; राष्ट्रवादीची मोठी मागणी

डेलकर आत्महत्या प्रकरणी भाजपा नेत्यांना अडकवण्यासाठी होता देशमुखांचा दबाव – परमबीर सिंग

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.