गेल्या अनेक दिवसांपासून राणा दाम्पत्य चांगलेच चर्चेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याची मागणी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा(Ravi Rana) यांनी केली होती. त्याकरिता राणा दाम्पत्य मुंबईत देखील आले होते. यानंतर राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला होता.(Navneet Rana angry on boy who demand to hanuman chalisa)
मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याच्या मागणीमुळे राणा दाम्पत्य चांगलेच अडचणीत सापडले होते. या प्रकरणी राणा दाम्पत्य १४ दिवस तुरुंगात होते. त्यानंतर जामिनावर राणा दाम्पत्याची तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राणा दाम्पत्याने थेट दिल्लीत जाऊन हनुमान चालीसा पठण केले होते.
त्यावेळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची फार चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा खासदार नवनीत राणा चर्चेत आल्या आहेत. खासदार नवनीत राणा यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये एक तरुण खासदार नवनीत राणांना हनुमान चालिसा ऐकवण्यास सांगत आहे.
यावर खासदार नवनीत राणा त्या तरुणावर भडकल्या आहेत. साध्य ही ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये सुरवातीला तरुण त्याच्यासंदर्भात माहिती देतो. “मॅम नमस्ते, मै पारीख साखरी बोल रहा हूँ नागपुर से…मॅम हनुमान चालिसा सुनाइये प्लीज”, असे तो तरुण फोनवरून नवनीत राणांना सांगतो.
यावर खासदार नवनीत राणा त्या तरुणाला सुरवातीला समजवतात. पण तरीदेखील तो तरुण खासदार नवनीत राणा यांच्याकडे हनुमान चालिसा ऐकवण्याचा आग्रह धरतो. यावर खासदार नवनीत राणा भडकतात. खासदार नवनीत राणा त्या तरुणाला मारहाण करण्याची भाषा करतात. “मारुंगी मैं…इतना मारुंगी कां के नीचे, सब सही आ जायेगा तुझको”, असे खासदार नवनीत राणा त्या तरुणाला ऑडिओ क्लिपमध्ये म्हणाल्या आहेत.
सध्या या ऑडिओ क्लिपची जोरदार चर्चा रंगत आहे. काही दिवसांपूर्वी एक पत्रकाराने खासदार नवनीत राणा यांना हनुमानाचं खऱ्या नावाबद्दल परष विचारला होता. त्यावर खासदार नवनीत राणा यांना उत्तर देता आलं नाही. तसेच त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. या प्रश्नावर खासदार नवनीत राणांची चांगलीच पंचाईत झाली होती.
महत्वाच्या बातम्या :-
गौशाळेत उपासमारीने गायींचा मृत्यु, कावळे तोडत आहेत त्यांचे लचके, दान मागून अन्नाची व्यवस्था
पुर्ण IPL मध्ये चांगली कामगिरी करणारी लखनऊ नेमकं कुठे चुकली? केएल राहुलकडून काय चुकलं?
घरे मिळत नव्हती तेव्हा घरे द्या, मग कमी किंमतीत द्या, किंमत कमी केली तर अर्ध्या किंमतीत द्या, आता अजून…..