काल राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची आज भायखळा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. भायखळा कारागृहातून सुटका झाल्यानंतर खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांना प्रकृतीच्या कारणास्तव लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राणा दाम्पत्याच्या वकिलांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.(navneet rana and ravi rana emotional video viral)
खासदार नवनीत राणांचे पती रवी राणा यांची देखील तळोजा कारागृहातून सुटका झाली आहे. यावेळी गाडीमधून जात असताना रवी राणा हनुमान चालिसा पठाण करत होते. कारागृहातून सुटका झाल्यानंतर आमदार रवी राणा यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन पत्नी नवनीत राणा यांची भेट घेतली. यावेळी नवनीत राणा भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
पती रवी राणांना पाहताच खासदार नवनीत राणा रडू लागल्या. यावेळी आमदार रवी राणांनी खासदार नवनीत राणा यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी रवी राणा यांना देखील अश्रू अनावर झाले होते. खासदार नवनीत राणा यांना बीपी, अंगदुखीचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
— Navnit Ravi Rana (@navneetravirana) May 5, 2022
यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील खासदार नवनीत राणांची भेट घेतली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवनीत राणांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी आमदार रवी राणा यांची भेट घेतली. या सर्व प्रकरणावरून भाजप नेते किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“जेलमधून नवनीत राणा यांना थेट रुग्णालयात जावं लागलं. हनुमान चालिसा म्हणल्यानंतर गुन्हा दाखल करतात. या माफिया सरकारची मला लाज वाटते”, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या बेशरमीची हद्द आहे, असे देखील भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्य मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणासाठी मुंबईत दाखल झाले होते. यावेळी शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याचा जोरदार विरोध केला होता. त्यानंतर राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून राणा दाम्पत्याला अटक देखील झाली होती.
महत्वाच्या बातम्या :-
“मशिदींवरचे भोंगे बंद करतो, पण साईबाबांची काकड आरती भोंग्यावरच होऊ द्या”
मनसेत फाटाफूट! संजय राऊतांच्या उपस्थितीत पुण्यातील मनसेचा ‘हा’ बडा नेता करणार शिवसेनेत प्रवेश
राम मंदिराच्या उभारणीची संपुर्ण टाईमलाईन, जाणून घ्या कधी पुर्ण होणार राम मंदिराचे काम?