इम्रान खान माझा मोठा भाऊ आहे, त्यांनी मला खुप प्रेम दिले; काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

करतारपूर कॉरिडॉर पुन्हा उघडले आहे. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी पंजाब प्रदेश काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू शनिवारी करतारपूर साहिब गुरुद्वारा येथे पोहोचले होते, जिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले होते.

यावेळी सिद्धू यांनी करतारपूर प्रकल्प व्यवस्थापन युनिटचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहम्मद लतीफ यांच्याशीही संवाद साधला होता. पण यावेळी त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. त्यांनी मला खूप प्रेम दिले आहे.

पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने क्रिकेटपटू-काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांचे दोन्ही देशांमधील शीख तीर्थक्षेत्र करतारपूर साहिबचा कॉरिडॉर उघडण्याच्या भूमिकेबद्दल त्यांचे कौतुक केले होते. २०१८ मध्ये इम्रान खान आणि सिद्धू यांच्यातील संबंध प्रसिद्धीच्या झोतात आले होते, जेव्हा सिद्धू पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित होते.

नवज्योत सिद्धू यांचा करतारपूरला भेट देण्याचा कार्यक्रम १८ नोव्हेंबरला नियोजित होता. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव गृह मंत्रालयाने शीख यात्रेकरूंच्या तिसऱ्या तुकडीच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट केले. गुरुवारी करतारपूर साहिबला भेट देणाऱ्या मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सिद्धूच्या नावाचा समावेश नव्हता.

सिद्धू यांना बुधवारी उशिरा सांगण्यात आले की गुरुपूरबच्या एका दिवसानंतर २० नोव्हेंबर रोजी करतारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देणाऱ्या व्हीआयपींच्या तिसऱ्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट आहे. त्यांचे मीडिया सल्लागार जगतार सिद्धू म्हणाले, ‘परवानगी घेण्यासाठी वेळेत फॉर्म भरला होता. पण चन्नी यांच्या अधिकृत शिष्टमंडळात पीपीसीसी प्रमुखांचा समावेश नव्हता.

तर मुख्यमंत्री कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, सिद्धू, पीपीसीसीचे कार्यकारी अध्यक्ष आणि ज्येष्ठ आमदारांसह ५० व्हीआयपींची यादी १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी गृह मंत्रालयाला पाठवण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव, केंद्राने सर्व व्हीआयपींना त्याच दिवशी करतारपूर साहिबला भेट देण्यास नकार दिला आणि व्हीआयपींना तीन गटांमध्ये विभागले.

महत्वाच्या बातम्या-
डिव्हिलियर्सने क्रिकेटला अलविदा केल्यानंतर चहलची पत्नी झाली भावूक, लांबलचक पोस्ट लिहित म्हणाली..
महाराष्ट्र दोन वर्षांपुर्वीच स्वतंत्र झाला, कंगणा पाठोपाठ संजय राऊतांचेही वादग्रस्त वक्तव्य
किळसवाणे! ‘या’ प्रसिद्ध गायिकेने लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चाहत्याच्या तोंडावर केली लघुशंका, नंतर म्हणाली..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.