नवज्योत सिंग सिद्धू यांना राखी सावंत म्हटल्याने आपचा नेता वादात, बॉलीवूडमधूनही संताप  

नवी दिल्ली । काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू हे वेगवेगळ्या कारणांमूळे नेहमी चर्चेत असतात. पक्षातील अनेक सहकाऱ्यांसोबत त्यांचे मतभेद देखील आहेत. आता मात्र नवज्योत सिंग सिद्धु हे पंजाब राजकारणातील राखी सावंत असल्याची टीका, आम आदमी पक्षाचे आमदार राघव चड्डा यांनी केली आहे.

यामुळे आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आम आदमी पार्टीचे आमदार राघव चड्ढा यांनी सिद्धु यांच्या शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यावर ही टीका केली. कृषी कायद्यांच्या विरोधात आम आदमी पार्टीने काळा दिवस साजरा केला. यावेळी ते बोलत होते.

आम आदमी पक्षाच्या शेतकरी आंदोलनाबद्दलच्या भूमिकेवर नवज्योत सिंग सिद्धू यांनी टीका केली होती. अरविंद केजरीवालजी तुम्ही खासगी मंडीचा एक कायदा नोटीफाय केला होता. तो डिनोटीफाय केला का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आम आदमी पक्ष नाटक करत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे आपकडून त्यांच्यावर निशाणा साधला गेला आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांना कॅप्टनविरोधात टीकेची झोड उठवल्याने काँग्रेस हायकमांडकडून फटकारले गेले आहे. त्यामुळे बदला म्हणून ते अरविंद केजरीवाल यांच्या मागे लागले, अशी टीका केली आहे. यामुळे आता राजकारण तापले आहे.

राघव चड्ढा यांच्या ट्विटला विरोध करत टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक यांनी ट्विट केले, ज्यात तिने आप नेत्यावर जोरदार निशाणा साधला. राघव चड्ढाला उत्तर देताना, टीव्ही अभिनेत्रीने लिहिले, “राखी सावंत – सर्वात मेहनती महिला जी तिला कोणत्याही प्रोजेक्टमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम करते.

पत्रकार रोहिणी सिंह यांनी राघव चड्ढा यांच्या ट्विटला विरोध करत लिहिले, भारतीय राजकारणात दुराचाराने वर्चस्व गाजवले आहे. स्त्रीचे नाव न घेता विरोधकावर टीका करता येत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.