लोकांना खायला अन्न नाही, अन् तुम्ही पैसे उडवता! लाजा वाटूद्या; अभिनेत्यांवर नवाजूद्दीन संतापला

राज्यभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या गाईडलाईन्स आखत आहे. त्यामुळे आता राज्यातील चित्रपटांचे शुटींग थांबवण्यात आले आहे.

अशी परिस्थिती पाहता काही सेलिब्रिटी परदेशात गेले आहे, तर काही सेलिब्रिटी सुट्टीचा आनंद घेताना दिसून येत आहे. हे पाहून बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने या सगळ्यांवर संताप व्यक्त केला आहे.

लोकांकडे अन्न नाही आणि आपण असे पैसे उडवत आहोत. थोटी तरी लाज वाटू द्या, असे नवाजुद्दीन सिद्दीकीने म्हटले आहे. याबाबत स्पॉटबॉयने वृत्त दिले आहे.

नवाजला सेलिब्रिटींच्या सुट्टी आणि तिथून शेअर करत असलेल्या फोटोंबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, लोकांकडे खायला अन्न नाहीये, त्यामुळे सुट्टयांमध्ये पैसे उडवणाऱ्या सेलिब्रिटींना लाज वाटली पाहिजे, असे नवाजने म्हटले आहे.

तसेच ते लोक कशाबद्दल बोलतील, अभिनयाबद्दल? या लोकांनी मालदिवचा तमाशा बनवला आहे. त्यांच्या पर्यटन उद्योगाची काय व्यवस्था आहे, मला माहिती नाही. पण माणूस म्हणून आपल्या सुट्टीचे तरी फोटो आपल्याकडे ठेवा, सोशल मीडियावर शेअर करु नका, असे नवाजने म्हटले आहे.

प्रत्येक व्यक्ती इथे कठिण परिस्थितीचा सामना करत आहे. कोरोनाच लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. जे आधीच अनेक समस्यांचा सामना करत आहे, त्यांना हे फोटो दाखवून आणखी दुखवू नका, असेही नवाजने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

भाईजानसाठी कायपण! सलमानच्या ‘राधे’च्या प्रमोशनसाठी अभिनेत्री पीपीई किट घालून रस्त्यावर
कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आता रिया चक्रवर्ती आली पुढे; म्हणाली, मला डायरेक्ट मेसेज करा
मोदींमुळेच कोरोनाचा भडका, हिंदू नाराज होऊ नये म्हणुन कुंभमेळा होऊ दिला, बंगालमध्ये रॅली काढल्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.