navale bridge accident real reason | रविवारी पुण्याच्या नवले पूलावर भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये जवळपास २४ वाहने चक्काचुर झाली होती. एका कंटेनरमुळे हा अपघात झाला होता. कंटेनरने मागून येऊन या वाहनांना धडक दिली होती. त्यामुळे हा अपघात झाला आहे.
अपघात झाल्यानंतर कंटेनरच्या चालकाने त्या ठिकाणाहून तातडीने पळ काढला होता. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात होते. पण आता या अपघाताचे खरे कारण समोर आले आहे. कंटेनर चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.
हा कंटेनर भरधाव वेगात साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. त्यानंतर हे कंटेनर नवले पूलाजवळ आल्यानंतर हा अपघात झाला. रस्त्यावर असणाऱ्या तब्बल २४ वाहनांना या कंटेनरने धडक देत त्यांना चिरडले आहे. हा अपघात इतका मोठा होता की त्यामध्ये १३ जण गंभीर जखमी झाले आहे.
या अपघातात अनेक कार, दुचाकी आणि रिक्षांचा चक्काचुर झाला आहे, या भयानक अपघातामुळे ४-५ किलोमीटर लांबपर्यंत ट्राफिक झाली होती. हा अपघात ब्रेक फेल झाल्यामुळे झाल्याचे सांगण्यात येत होते. पण आता काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. कंटेनरचालक हा उतारावर न्युट्रल करुन कंटेनर चालवत होता. असे समोर आले आहे.
कंटेनर चालकाने उतारावर इंजिन बंद केले होते. त्यामुळे ती कंट्रोल होऊ शकली नाही आणि हा अपघात झाला. चालकाच्या अशा मस्तीमुळे १३ जण गंभीर जखमी झाले. तसेच २४ वाहन्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
दरम्यान, या अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर त्यांनी तिथली पाहणी केली आहे. कंटेनरचालकाचे नाव मनीलाल यादव असे आहे. त्याच्यावर सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.
महत्वाच्या बातम्या-
ankit joshi : मुलीला सांभाळण्यासाठी वडिलांनी सोडली व्हाईस प्रेसिडेंटची नोकरी, लाखोंच्या पगारावर सोडले पाणी
हॉटेलचे ३७ वर्षे जुने बिल व्हायरल; शाही पनीर अन् दाल मखनीची किंमत वाचून हैराण व्हाल
BCCI ने रोहीतला सांगीतले ‘आम्ही ट्वेंटीसाठी नवा कर्णधार निवडतोय’; रोहित उत्तर देत म्हणाला…