फडणवीसांची कोंबड्यासारखीच अवस्था झालीये; राष्ट्रवादीची फडणवीसांवर बोचरी टिका

मुंबई | राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. याच पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाची राजकीय नेते आढावा घेत आहे. मात्र या दौऱ्यावरुन आता राजकारण तापल्यायला सुरुवात झाली आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती.

याचाच धागा पकडत राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी तिखट शब्दात माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. फडणविसांनी केलेल्या टीकेला चोख मलिक यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

माझ्यामुळे इतर पक्षाचे लोक बाहेर फिरायला लागले असं टीका फडणवीस म्हणाले होते. याबाबत बोलताना मलिक म्हणाले, ‘कोंबडयाला वाटतं की मी आरवलो नाही तर सकाळ होणारच नाही, पण प्रत्यक्षात तसं काहीही नसतं. कोंबडा झोपला तरी सकाळ होते, हे देवेंद्र फडणवीसांनी लक्षात घ्यायला हवे.’

तसेच ‘राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची भूमिका राज्य सरकारची राहिल, सरकार नक्कीच मदत जाहीर करेल. केंद्र सरकारनेही मदत करण्याची जबाबदारी घ्यावी, राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये मदतीसाठी निर्णय घेतला जाईल,’ असे मलिक यांनी सांगितले.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
‘दौर्‍यात थिल्लर स्टेटमेंट करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. लोकांना मदत करण्याची यांच्यात हिंमत नाही. मुख्यमंत्री दोन-तीन तासांचा प्रवास करून थोड्या काळासाठी बाहेर पडले आहेत. यावेळी लोकांनी त्यांना काय प्रतिसाद दिला माहीतच आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केली होती.

 

महत्त्वाच्या बातम्या
“सत्ता गेल्यावर तर सगळेच जमिनीवर येतात, माणूस सत्तेवर असतांना जमिनीवर पाहिजे”
अखेर मुहूर्त ठरला? पवारांच्या संकेतानंतर खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या हालचालींना वेग
१००० एकरात २० हजार मॅट्रिक टन बटाटा; वार्षिक उत्पन्न २५ करोड
मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत? अखेर शरद पवारांनीच सांगितले कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.