प्रेग्नंसीदरम्यान ‘हे’ नैसर्गिक पदार्थ करतील ‘ब्लीच’ म्हणून काम; पहा कशी राखायची चेहऱ्याची निगा

प्रेगनेंट राहिल्यानंतर स्त्रियांमध्ये अनेक निरनिराळे बदल घडून येतात. उलट्या, मळमळ या व्यतिरिक्त नकोसे वाटणारे बदल आपण पाहणार आहोत.गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीनंतर काही स्त्रियांच्या चेहऱ्यावर विशेषत: गाल, हनुवटी आणि ओठांभोवती अवांछित केस उगवतात.

हार्मोन्सच्या चढउतारांमुळे ही समस्या उद्भवताना पाहायला मिळते. चेहऱ्यावरील हे नको असलेले केस खूप वाईट दिसतात. तसेच स्त्रिया पुरुषांसारखे दाढीही करू शकत नाहीत. या प्रकरणात ब्लीच हा एकमेव पर्याय आहे.

परंतु ब्लीच क्रीममध्ये अनेक प्रकारची रसायने वापरली जातात. त्यामुळे अनेक तज्ज्ञ गरोदरपणात ब्लीच सुरक्षित मानत नाहीत. अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. हे नैसर्गिक उपाय ब्लीच म्हणून काम करतील आणि चेहऱ्यावरील केस लपवण्यासाठी उपयुक्त ठरतील.

संत्र्याची साल-  संत्र्याच्या सालीमध्ये आढळणाऱ्या सायट्रिक अँसिडमुळे त्यात नैसर्गिक ब्लीचचे गुणधर्म असतात. संत्र्याची साल सुकवून पावडर बनवा. त्यात दूध मिसळून चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर मोठा फरक पडेल.

Orange (Santra) - NavDelight | Buy fresh fruits and vegetables online

झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लिंबाचा रस लावा आणि झोपा. ही प्रक्रिया काही दिवसांच्या अंतराने करत रहा. लिंबूमध्ये ब्लीचिंग एजंट्स देखील असतात. यामुळे तुमच्या नको असलेल्या केसांचा रंग हलका होईल.

बेसन, हळद, गुलाबपाणी यांची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा, त्वचेचा रंग सुधारतो. याशिवाय त्वचेच्या सर्व समस्या कोरफडाने दूर केल्या जातात. आपण कोरफड जेल वापरू शकता.

दही तुमच्या त्वचेसाठी नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करते. यासाठी तुम्हाला रोज चेहऱ्यावर दही लावावे लागेल. काही वेळ चेहऱ्यावर मसाज करा. १५-२० मिनिट ठेवून नंतर थंड पाण्याने धुवा.

बटाटा किंवा टोमॅटोचा रस नियमितपणे लावल्याने चेहऱ्यावरील केसांचा रंग हलका होऊ लागतो. याशिवाय चेहऱ्यावर मध आणि लिंबू लावल्याने अनावश्यक केस निघून जाण्यास मदत होते.

पपई दुधात चोळल्याने चेहऱ्याचा रंग स्पष्ट होतो आणि केसांचा रंग फिका होतो. हे एक उत्तम नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करते. याशिवाय पपईमुळे चेहरा चमकदार बनतो.

Papaya – SudhaVentures

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दह्यामध्ये बेसन मिसळून रोज चेहऱ्यावर लावू शकता. हे एक उत्तम नैसर्गिक ब्लीच देखील आहे. दोन चमचे दही मध्ये एक चमचा बेसन पीठ मिसळून चेहऱ्यावर चेहऱ्यावर लावल्यास चेहरा चमकतो. तसेच हा उपाय सगळेच करू शकतात.

हे ही वाचा-

पूरग्रस्त भागात ३ दिवसात ११३७ किलोमीटर फिरलो, आता राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार

मनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर अभिनेत्री; मनोज समोर दिसताच पडल्या होत्या पाया

देशातील बँकांमध्ये, विमा कंपन्यांमध्ये ५० हजार कोटी पडून, लोक पैसे जमा करून विसरले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.